E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ विशेष रेल्वे आजपासून धावणार
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
प्रवाशांचा पहिला मुक्काम रायगडावर
मुंबई : भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी) ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या एका विशेष रेल्वे आज (सोमवार) पासून प्रवाशांच्या सेवेत सुरू होते आहे.
‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ अंतर्गत आजपासून ही यात्रा सुरू होणार आहे. विशेष म्हणजे ही रेल्वे पहिल्याच दिवशी रायगड किल्ल्याला भेट देणार आहे. या रेल्वेचा एकूण पाच दिवसांचा महाराष्ट्रभर प्रवास असेल. सकाळी साडे दहा वाजता ही रेल्वे सीएसएमटी मुंबईवरून माणगाव रेल्वे स्थानकात पोहचणार आहे. त्यानंतर, प्रवाशांना येथील रायगड किल्ल्यावर जाऊन किल्ले रायगड पाहता येईल.
किल्ले रायगडावर नुकताच शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून शिवभक्त येथे अभिवादन करण्यासाठी जमले होते. किल्ले रायगडवर पर्यटनासाठी व शिवरायांचा जाज्वल्य इतिहास जाणून घेण्यासाठीही दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. आता, रेल्वे विभागाने शिवाजी महाराजांच्या नावानेच एक विशेष पर्यटन गाडी सुरू केली आहे. रायगड, प्रतापगड, लाल महाल, कोल्हापूर, पन्हाळा अशा ऐतिहासिक ठिकाणांना ही ट्रेन भेट देणार असून आजपासूनच या रेल्वे गाडीचा शुभारंभ होत आहे.
रेल्वेचा प्रवास पुढीलप्रमाणे :
शुभारंभ ९ जून
कालावधी : ५ दिवसांची यात्रा (सकाळी समाप्ती)
प्रारंभ व समाप्ती स्थान: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई
प्रवास सुरु व संपण्याचे स्थानक : दादर, ठाणे
प्रवासमार्ग पुढीलप्रमाणे :
मुंबई(सीएसएमटी)-रायगड-पुणे-शिवनेरी-भीमाशंकर-प्रतापगड-कोल्हापूर-पन्हाळा- मुंबई. म्हणजे, मुंबई, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या ४ जिल्ह्यातून ही ट्रेन ऐतिहासिक पर्यटन घडवणार आहे.
प्रमुख स्थळांना भेट
रायगड किल्ला - छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती.
लाल महाल, पुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले.
कसबा गणपती व शिवसृष्टी, पुणे-पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय.
शिवनेरी किल्ला - छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ.
भीमाशंकर ज्योतिर्लिंग - १२ ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ.
प्रतापगड किल्ला - अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण.
कोल्हापूर - महालक्ष्मी मंदिर
पन्हाळा किल्ला - बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक.
Related
Articles
निरा बंधार्यावरून १५ वर्षांचा मुलगा पाण्यात वाहून गेला
03 Jul 2025
मुंबई भाजपमध्ये धुसफूस
02 Jul 2025
संततधार पावसामुळे पेरण्या खोळंबल्या
03 Jul 2025
महिलेवर अत्याचार करुन खून करणार्यास जन्मठेप
04 Jul 2025
तामिळनाडूत रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या शाळेच्या बस आणि रेल्वेचा अपघात
08 Jul 2025
अदानी, अंबानी यांना नजरेसमोर ठेवून धोरणे आखू नका

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
जीएसटी संकलनात घट
6
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला