E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
निरा बंधार्यावरून १५ वर्षांचा मुलगा पाण्यात वाहून गेला
Samruddhi Dhayagude
03 Jul 2025
सराटी येथील निरा नदीच्या बंधार्यावरील घटना
इंदापूर, (वार्ताहर) : जगद्गुरू संत श्री तुकोबारायांच्या निरा स्नानापूर्वी निरा नदीकाठी एक दुर्घटना घडली. इंदापूर तालुक्यातील सराटी आणि अकलूजला जोडणार्या निरा नदीवरील बंधार्यातून मंगळवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास वारीत सहभागी असलेला गोविंद कल्याण फोके हा 15 वर्षीय मुलगा अंघोळीला नदीत गेल्यानंतर पाण्यात वाहून गेला. तो जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील झिरपी गावचा रहिवासी आहे. तो आजी परेगा प्रभाकर खराबे यांच्यासोबत संत तुकोबांच्या वारीत चालत होता. त्याचा शोध अद्याप सुरूच आहे.
दरम्यान, गोविंद वाहून जात असल्याचे दिसताच निरा नदीवर कर्तव्यावर असणारे बारामती तालुक्यातील मोरगाव येथील होमगार्ड कर्मचारी राहुल अशोक ठोंबरे यांनी महिलेचा ओरडण्याचा आवाज आल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता नदीमध्ये उडी टाकली. दोनवेळा त्याला हाताला धरून पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या अतिवेगामुळे तो प्रयत्न निष्फळ ठरला. होमगार्ड ठोंबरे एका बाजूला पाण्यातून फेकले गेले, तर तो मुलगा पाण्याच्या वेगात पुढे वाहून गेला. याबाबत पोलिस उपनिरीक्षक अभिजित कणसे म्हणाले, नदीमध्ये अंघोळीला गेलेला हा मुलगा वाहून गेला असून, त्याला शोधण्यासाठी स्थानिक व एनडीआरएफचे जवान पोलिस शोधकार्य करीत आहेत.
आजीचा एकच आक्रोश
अंघोळीला आम्ही बरोबरच नदीकाठी आल्यानंतर तो पाण्यात गेला आणि पाण्याच्या वेगाच्या भोवर्यात अडकला. मी आरडाओरडा केला, त्या वेळी काहींनी नदीमध्ये उड्या टाकल्या तर काहींनी शोध घेतला. मात्र, तो अद्याप आढळून आला नाही, असे सांगताना आजीला गहिवरून आले होते. या वेळी आजीने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
Related
Articles
मद्याच्या दुकानात दरोडा
23 Jul 2025
इंग्लंडचा भारतीय महिलांविरुद्ध विजय
21 Jul 2025
गंभीर जखमी झालेल्या मुलीस दिल्लीत हलवले
21 Jul 2025
सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार
24 Jul 2025
गाझामध्ये कायमस्वरूपी युद्धबंदी व्हावी
25 Jul 2025
कर्करोग नियंत्रणासाठी उपायोजना करा
24 Jul 2025
मद्याच्या दुकानात दरोडा
23 Jul 2025
इंग्लंडचा भारतीय महिलांविरुद्ध विजय
21 Jul 2025
गंभीर जखमी झालेल्या मुलीस दिल्लीत हलवले
21 Jul 2025
सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार
24 Jul 2025
गाझामध्ये कायमस्वरूपी युद्धबंदी व्हावी
25 Jul 2025
कर्करोग नियंत्रणासाठी उपायोजना करा
24 Jul 2025
मद्याच्या दुकानात दरोडा
23 Jul 2025
इंग्लंडचा भारतीय महिलांविरुद्ध विजय
21 Jul 2025
गंभीर जखमी झालेल्या मुलीस दिल्लीत हलवले
21 Jul 2025
सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार
24 Jul 2025
गाझामध्ये कायमस्वरूपी युद्धबंदी व्हावी
25 Jul 2025
कर्करोग नियंत्रणासाठी उपायोजना करा
24 Jul 2025
मद्याच्या दुकानात दरोडा
23 Jul 2025
इंग्लंडचा भारतीय महिलांविरुद्ध विजय
21 Jul 2025
गंभीर जखमी झालेल्या मुलीस दिल्लीत हलवले
21 Jul 2025
सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार
24 Jul 2025
गाझामध्ये कायमस्वरूपी युद्धबंदी व्हावी
25 Jul 2025
कर्करोग नियंत्रणासाठी उपायोजना करा
24 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
बाजारात खोबर्याचा तुटवडा
5
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)