मुंबई, (प्रतिनिधी) : मुंबई भाजपचे अध्यक्षपद आशीष शेलार यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी मुंबई अध्यक्ष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीत फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जाणारे आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली असून निवडणूक व्यवस्थापन आणि प्रत्यक्ष कार्यवाहीसाठी पक्षाचे मुंबई अध्यक्ष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समिती सदस्य म्हणून माजी खासदार किरीट सोमैया, माजी मंत्री प्रकाश मेहता, भाई गिरकर, माजी आमदार मधू चव्हाण, राज पुरोहित, आमदार कालीदास कोळंबकर आदींचा समावेश आहे.
Fans
Followers