E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
महिलेवर अत्याचार करुन खून करणार्यास जन्मठेप
Samruddhi Dhayagude
04 Jul 2025
पुणे : महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करत जखमी अवस्थेत तिच्यावर अत्याचार करणार्यास न्यायालयाने जन्मठेप व ३० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी हा निकाल दिला. राजेश मनीराम यादव (रा. वाकडेवाडी, मुळ रा. उत्तर प्रदेश) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना १८ फेबु्रवारी २०१५ ला शिवाजीनगर येथील अनुतेज अथर्व सोसायटीत घडली होती. महिला ही घरात एकटीच राहत होती. त्याचा फायदा घेत यादव याने तिच्याशी ओळख वाढविली. घटनेच्या दिवशी महिलेला मदत करण्याच्या बहाण्याने तिच्या घरी जात मालिश करण्यास सुरूवात केली. यावेळी त्याने महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यास महिलेने विरोध केला असता त्याने रागाच्या भरात तिचे तोंड दाबले. त्यानंतर भाजी कापाच्या चाकूने तिच्या गळ्यावर वार केले.
या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असताना त्याने तिच्यावर अत्याचार केला. या दरम्यान, महिलेचा मृत्यू झाला. अत्याचारानंतर पळून जात असताना त्याने महिलेच्या कानातील सोन्याचे टॉप्स, पायातील चांदीचे पैजण, मोबाईल आणि ३० हजार रोख चोरली. महिलेच्या घराचे दार उघडे असल्याने शेजारचे तिच्या घरात आले. तेव्हा त्यांना महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. या प्रकरणी महिलेच्या मुलाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपी यादववर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी अधिक तपास करत आरोपीला अटक केली.
Related
Articles
अभिनेता आमिर खानची फसवणूक करण्याचा प्रयत्न
19 Jul 2025
धनखड यांचा धक्का (अग्रलेख)
24 Jul 2025
हिंदी सक्ती करुनच बघा, दुकानांसह शाळा बंद करु
19 Jul 2025
जनहित अर्ज सुविधेचा गैरवापर : न्यायालय
25 Jul 2025
जमात-ए-इस्लामीचे ढाक्यात शक्ती प्रदर्शन
21 Jul 2025
कोयता बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
20 Jul 2025
अभिनेता आमिर खानची फसवणूक करण्याचा प्रयत्न
19 Jul 2025
धनखड यांचा धक्का (अग्रलेख)
24 Jul 2025
हिंदी सक्ती करुनच बघा, दुकानांसह शाळा बंद करु
19 Jul 2025
जनहित अर्ज सुविधेचा गैरवापर : न्यायालय
25 Jul 2025
जमात-ए-इस्लामीचे ढाक्यात शक्ती प्रदर्शन
21 Jul 2025
कोयता बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
20 Jul 2025
अभिनेता आमिर खानची फसवणूक करण्याचा प्रयत्न
19 Jul 2025
धनखड यांचा धक्का (अग्रलेख)
24 Jul 2025
हिंदी सक्ती करुनच बघा, दुकानांसह शाळा बंद करु
19 Jul 2025
जनहित अर्ज सुविधेचा गैरवापर : न्यायालय
25 Jul 2025
जमात-ए-इस्लामीचे ढाक्यात शक्ती प्रदर्शन
21 Jul 2025
कोयता बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
20 Jul 2025
अभिनेता आमिर खानची फसवणूक करण्याचा प्रयत्न
19 Jul 2025
धनखड यांचा धक्का (अग्रलेख)
24 Jul 2025
हिंदी सक्ती करुनच बघा, दुकानांसह शाळा बंद करु
19 Jul 2025
जनहित अर्ज सुविधेचा गैरवापर : न्यायालय
25 Jul 2025
जमात-ए-इस्लामीचे ढाक्यात शक्ती प्रदर्शन
21 Jul 2025
कोयता बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
20 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
बाजारात खोबर्याचा तुटवडा
5
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)