E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
सारसबाग बंद ठेवून मुस्लिम धर्मियांना रोखले
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
महापालिकेचा धक्कादायक निर्णय
पुणे : महापालिकेने बासी ईदच्या पार्श्वभूमीवर सारसबाग बंद ठेवून शेकडो मुस्लिम धर्मियांच्या आनंदावर विरजण घातले. सारसबागेत मुस्लिम धर्मियांना रोखण्याच्या या धक्कादायक निर्णयावरून महापालिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सारसबाग बंद ठेवून महापालिकेने त्यांच्या मुलभूत नागरी हक्कांवरच घाला घातला, असे परखड मत व्यक्त करीत सामाजिक कार्यकर्ते आणि नागरी संघटनाकंडून चीड व्यक्त करण्यात आली.
भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी सारसबागेत बासी ईद साजरी करण्याची प्रथा अनिष्ट असल्याची भूमिका घेत त्याविरोधात हिंदू संघटनांनी तक्रारी केल्या असल्याचे सांगत महापालिका आयुक्तांना पत्र दिले होते. ईदच्या दुसर्या दिवशी बासी ईद असते. या दिवशी सारसबाग बंद ठेवावी, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली होती. त्यामुळे रविवारी सारसबाग बंद ठेवण्यात आली. वर्षानुवर्षे बासी ईद साजरी करण्यासाठी मुस्लिम धर्मिय नागरिक सहपरिवार सारसबागेत येतात. त्यांना पालिकेच्या निर्णयाचा फटका बसला. मुलाबाळांसह सारसबागेत आलेल्या नागरिकांना घरी परत जावे लागले. यावर सामाजिक विचारवंत अन्वर शेख यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महापालिकेच्या पक्षपाती भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सारसबाग बंद ठेवून मुस्लिम धर्मियांना रोखले
जर मुस्लिम धर्मियांकडून पालिकेला कर भरला जातो, तर त्यांना सार्वजनिक बागा, उद्याने वापरण्याचा पूर्ण अधिकार आहे. एक खासदाराच्या सूचनेवरून सार्वजनिक बाग बंद करणे, ही लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात जाणारी कृती आहे, असे त्यांनी म्हटले आहे.ईदच्या दुसर्या दिवशी अनेक मुस्लिम कुटुंबे आपल्या मुलांसह फिरण्यासाठी सारसबाग आणि इतर बागांमध्ये जातात. ही अलीकडची प्रथा नसून वर्षानुवर्षे तो परिपाठ राहिला आहे. या दिवसाचे महत्त्व सामाजिक सलोखा, कौटुंबिक आनंद आणि परस्पर स्नेह वृद्धिंगत करणारे असते. मात्र, यावर्षी विशेष कारण न देता फक्त एका लोकप्रतिनिधीच्या सूचनेवरून सारसबाग बंद ठेवण्यात आली, यामुळे सुजाण नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
महापालिकेने सारसबाग बंद ठेवण्यामागील कारण स्पष्ट करावे, भविष्यात कोणत्याही धार्मिक समुदायाच्या भावना दुखावणारे निर्णय टाळावेत. मुस्लिम समाजाच्या हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी आणि लोकप्रतिनिधीच्या दबावात येऊन सार्वजनिक सुविधा बंद करू नयेत, अशा मागण्या शेख यांनी महापालिका आयुक्ताना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत. दरम्यान, महापालिकेने या धक्कादायक निर्णयावरून टोलवाटोलवी सुरु केली असून स्थानिक पोलिस अधिकारी आणि उद्यान अधिक्षकांच्या बैठकीत सारसबाग बंद ठेवण्याचा निर्णय झाला, असे पालिकेने म्हटले आहे.
Related
Articles
आयफोन निर्मितीच्या कारखान्यातून शेकडो चिनी कर्मचार्यांची गच्छंती
04 Jul 2025
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद पाकिस्तानकडे
02 Jul 2025
‘एफ-३५ बी’ दुरुस्तीसाठी आले
07 Jul 2025
भीमाशंकरमध्ये व्हीआयपींच्या दर्शनामुळे भाविक हैराण
08 Jul 2025
जिल्हास्तरीय क्योरूगी, पुमसे तायक्कांदो स्पर्धांचे आयोजन
06 Jul 2025
लॉर्डस्वर बुमराहचा सामना करण्यासाठी चांगली तयारी करावी लागेल : मॅक्युलम

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
जीएसटी संकलनात घट
6
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला