संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद पाकिस्तानकडे   

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद जुलै महिन्यासाठी पाकिस्तानकडे आले आहे. दोन वर्षांच्या अस्थायी सदस्यत्वाचा भाग म्हणून पाकिस्तानकडे हे अध्यक्षपद असणार आहे. संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानचे प्रतिनिधी असीम इफ्तिखार अहमद हे महिनाभर सुरक्षा परिषदेचे नेतृत्व करतील. पाकिस्तानला १९३ पैकी १८२ मते मिळाली. सुरक्षा परिषदेत १५ अस्थायी सदस्य आहेत. पाकिस्तानला आठव्यांदा सुरक्षा परिषदेचा सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. 

Related Articles