‘एफ-३५ बी’ दुरुस्तीसाठी आले   

२५ ब्रिटिश अभियंते 

तिरुअनंतपुरम : आपत्कालीन स्थितीत तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आलेल्या ब्रिटन हवाई दलाच्या एफ-३५ बी विमानाच्या दुरूस्तीसाठी २५ ब्रिटीश अभियंत्यांचे पथक रविवारी केरळमध्ये दाखल झाले. 
 
१४ जूनला इंधनाची कमतरता आणि तांत्रिक बिघाडामुळे ब्रिटन हवाई दलाचे एफ-३५ बी हे लढाऊ विमान तिरुअनंतपुरम विमानतळावर उरविण्यात आले होते. त्याची दुरूस्ती करण्यात सुरूवातीला आलेल्या ब्रिटीश अभियंत्यांच्या पथकाला अपयश आले. त्यानंतर हे विमान हँगरमध्ये नेण्यात आले आहे. आता २५ अभियंत्यांचे एक पथक केरळमध्ये दाखल झाले आहे. हे पाचव्या पिढीतील अत्याधुनिक लढाऊ विमान असून, त्याची किंमत अंदाजे ९८० कोटी रूपये आहे.

Related Articles