जिल्हास्तरीय क्योरूगी, पुमसे तायक्कांदो स्पर्धांचे आयोजन   

पुणे : जिल्ह्यातील खेळाडूंचे कौशल्य विकसित व्हावे, खेळाला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्यातील सांघिक भावना दृढ व्हावी, या प्रमुख हेतूने येत्या १२ व १३ जुलै रोजी शहरातील यमुना नगर येथील प.पू.माधव गोळवलकर गुरूजी स्केटींग हॉल येथे दोन दिवसीय पुणे जिल्हा तायक्कांदो असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय क्योरूगी आणि पुमसे तायक्कांदो स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. त्यातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे. त्यामुळे इच्छुक खेळाडूंनी त्वरीत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन पुणे जिल्हा तायक्कांदो असोसिएशनचे सचिव तुषार आवटे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे. तसेच १८ ते २० जुलै या कालावधीत राज्यस्तरीय क्योरूगी आणि पुमसे तायक्कांदो स्पर्धा संपन्न होणार असून त्यासाठी ही पूर्वनिवड स्पर्धा असल्याचेही त्यांनी आवर्जून म्हटले आहे.   क्योरूगी (फाईटिंग प्रकार) आणि पुमसे (नियत हालचाली) या दोन गटांमध्ये स्पर्धा झाली. खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, संयम व शिस्त दाखवली. विजेत्यांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली असून जिल्ह्याचा अभिमान वाटावा, असे खेळाडू पुढे आले आहेत. ही स्पर्धा म्हणजे खेळाडूंना व्यासपीठ देणारा आणि त्यांच्या आत्मविश्वासात भर घालणारा एक उत्कृष्ट उपक्रम ठरेल.

Related Articles