E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रविवार केसरी
दोस्ताना संपला
Wrutuja pandharpure
15 Jun 2025
प्रा.जयसिंग यादव
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांचा मोठा वाटा आहे. दोघे मित्र; परंतु ट्रम्प यांच्या ‘प्रत्युत्तर कर’ आणि अन्य आर्थिक धोरणांमुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. आता दोघे एकमेकांचा पाणउतारा करत आहेत. दुरावा आता एवढा वाढला आहे की ते परस्परांचे आर्थिक नुकसान करायला लागले असून एकमेकांचे वस्त्रहरणही करत आहेत.
जगातील पहिल्या क्रमांकाची महासत्ता असलेल्या देशाचे अध्यक्ष आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती यांच्यादरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांनी संपूर्ण जगाला धक्का दिला . अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्स सारख्या कंपन्यांचे मालक एलन मस्क यांनी एकमेकांवर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. त्यात काही वैयक्तिक हल्लेदेखील आहेत.
आरोप किती खालच्या पातळीवर गेले आहेत, हे सांगण्यासाठी काही उदाहरणे दिली, तर ते वावगे ठरणार नाही. मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर गुन्हेगारी वृत्तीच्या जेफ्री एपस्टाईनबरोबर आक्षेपार्ह संबंध असल्याचा आरोप केला आहे. त्याला उत्तर म्हणून अमेरिकन सरकारने मस्क यांच्या कंपन्यांना दिलेले करार रद्द करून जनतेचे अब्जावधी डॉलर्स वाचवता येतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. या दोन विधानांमुळे अमेरिकेत अशांततेचे वातावरण निर्माण झाले. ट्रम्प यांच्या इशार्यानंतर मस्क यांच्या ‘टेस्ला’ला १५२ अब्ज डॉलर्स (सुमारे १३ लाख कोटी रुपये) नुकसान सहन करावे लागले आहे, तर मस्क यांच्या आरोपांमुळे विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोगासाठी आवाज उठवला आहे. या दोन्ही विधानांनंतर ट्रम्प आणि मस्क एकमेकांचे किती नुकसान करू शकतात, या संघर्षाचा मस्कच्या कंपन्यांवर आणि वैयक्तिक जीवनावर काय परिणाम होऊ शकतो, मस्क यांच्याशी होणार्या या संघर्षाचा ट्रम्प यांच्या राजकीय जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो हे प्रश्न विशेष चर्चेत आहेत.
ताज्या वादांनंतर ट्रम्प म्हणाले की ते आणि मस्क आता पूर्वीसारखे मित्र राहणार नाहीत. एवढेच नाही तर, मस्क यांच्या आक्रमक भूमिकेनंतर ट्रम्प ,या उद्योगपतीला दिलेली सरकारी कंत्राटे आणि अनुदान माजी अध्यक्ष जो बायडेन यांनी रद्द न केल्याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटते, असे म्हणाले. न्यूयॉर्क टाईम्सच्या एका अहवालात म्हटले आहे की मस्क यांची कंपनी टेस्ला आणि त्यांची अंतराळयान उत्पादक कंपनी स्पेसएक्स यांना गेल्या एका वर्षात १७ खाती आणि एजन्सींकडून शंभरहून अधिक कंत्राटे मिळाली. त्यांची किंमत तीन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. एका अंदाजा नुसार मस्क यांनी आतापर्यंत अमेरिकन सरकारकडून ३८ अब्ज डॉलर्सची कामे मिळवली आहेत. त्यापैकी बहुतेक स्पेसएक्सला देण्यात आली आहेत. याशिवाय, हरित ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ‘टेस्ला’ला सरकारकडून अनेक प्रकारची अनुदाने मिळतात. त्यात इलेक्ट्रिक कार खरेदीदारांना कर सवलतीची तरतूददेखील आहे. त्याचा सर्वाधिक फायदा ‘टेस्ला’ला होतो. तथापि, ट्रम्प या अनुदानांना कात्री लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे मस्क यांच्या कंपनीचा वार्षिक नफा १.२ अब्ज डॉलर्सने कमी होऊ शकतो.
‘द न्यूयॉर्क टाईम्स’ आणि ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ या वृत्तपत्रांनीे मस्क यांच्यावर ड्रग्ज वापराचा आरोप केला आहे. मस्क यांना नियम मोडूनही सरकारी कंत्राटे मिळाली आहेत. इतकेच नाही तर, द टाईम्सने आपल्या अहवालात मस्क यांना ड्रग्जशी संबंधित चाचण्या घेण्याचा इशारादेखील दिला आहे. तथापि, मस्क यांनी हे आरोप नाकारले आहेत. २०२४ मध्ये त्यांनी स्पष्ट केले की डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर ते केटामाइन हे औषध घेतात. ट्रम्प यांचे जवळचे सहकारी स्टीव्ह बॅनन अतिउजव्या नेत्यांमध्ये गणले जातात. त्यांनी ट्रम्प आणि मस्क यांच्यातील शब्दयुद्धादरम्यान म्हटले होते की सरकारने मस्क यांच्या स्थलांतर स्थितीची चौकशी करावी. बॅनन म्हणाले होते, की मस्क अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत आहेत आणि त्यांना ताबडतोब त्यांच्या देशात पाठवले पाहिजे. मस्क यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला होता पण ते अमेरिकन नागरिक आहेत. अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान मस्क आणि ट्रम्प यांच्यात अतिशय जवळीक होती. ट्रम्प यांना निवडून आणण्यात मस्क यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, तेव्हा अनेक लोकांचा असा विश्वास होता, की मस्क यांनी भविष्यात त्यांच्या कंपनीला फायदा व्हावा यासाठी योजना आखल्या होत्या.
ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर मस्क यांचे हित लक्षात घेऊन आर्थिक बाबींमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अधिकारांचा वापर करू शकतात असे अनुमान होते . यामध्ये मस्क यांना एजन्सींमधून सूट देणे, परकीय गुंतवणुकीत प्राधान्य देणे यासारख्या पावलांचा समावेश होता.तथापि, मस्क आणि ट्रम्प यांच्यातील दुराव्यामुळे मस्क यांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. असे मानले जाते की ट्रम्प हे मस्क यांच्या अडचणी वाढवू शकतात.
ट्रम्प यांच्या विजयाचे एक मोठे कारण म्हणजे त्यांचा उजव्या विचारसरणीचा मतदारवर्ग. मस्क यांनी ट्रम्प यांना आर्थिक मदत करुनही रिपब्लिकन पक्षाच्या पारंपरिक मतदारांनी ट्रम्प यांना केवळ अध्यक्ष होण्यास मदत केली नाही तर, त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दयांनाही पाठिंबा दिला. तथापि, आता ट्रम्प त्यांच्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ मोहिमेद्वारे मस्क यांना उजव्या विचारसरणीच्या मतदारांपासून वेगळे करू शकतात. अलिकडेच ट्रॉय नेहल्ससह अनेक खासदारांनी मस्क यांना लक्ष्य केले. याची झलक दिसून आली.मस्क हे देखील ट्रम्प यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतात. ट्रम्प सरकारविरुद्ध आपल्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्वीटर) या ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्मचा प्रचंड फायदा घेऊ शकतात. मस्क यांचे सध्या एक्सवर २२ कोटी फॉलोअर्स आहेत. मस्क यांनी एके काळी हा आधार ट्रम्प यांच्या बाजूने वळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यामुळे ट्रम्पना अध्यक्षपदी विराजमान होण्यास मदत झाली.. मस्क स्वतः ‘एक्स’चे मोठे वापरकर्ते असल्याने, ट्रम्प यांच्या धोरणांबाबत प्लॅटफॉर्मवरील भूमिकेवर ते वैयक्तिकरित्या प्रभाव टाकू शकतात.
अमेरिकेत नव्या पक्षाच्या स्थापनेबाबत मस्क यांनी ‘एक्स’वरच एक पाहणी केली.त्यात ५६ लाख मते पडली, त्यापैकी ८०.४ टक्के लोकांनी मस्क यांना पक्ष स्थापन करण्याबाबत अनुकूल मत दिले. तथापि, अमेरिकन मतदारांमध्ये मस्क यांचा फारसा प्रभाव नाही. ‘प्यू रिसर्च सेंटर’ने केलेल्या पाहणीनुसार, दहापैकी पाच प्रौढांमध्ये मस्क यांची प्रतिमा नकारात्मक आहे. तथापि, रिपब्लिकन किंवा उजव्या विचारसरणीच्या मतदारांमध्ये मस्क यांचा खूप प्रभाव आहे. येथे दहापैकी सात व्यक्ती मस्क यांना पाठिंबा देतात. अशा परिस्थितीमध्ये मस्क भविष्यात निवडणूक पातळीवर ट्रम्प यांचे नुकसान करू शकतात. एक नवी राजकीय चळवळ सुरू करू शकतात.
मस्क यांनी २०२४ मध्ये ट्रम्प यांच्या समर्थनार्थ रिपब्लिकन पक्षासाठी सुमारे २५० दशलक्ष डॉलर खर्च केले. सध्या मस्क यांच्या कंपन्यांचा अमेरिकेत तसेच परदेशात व्यवसायात मोठा वाटा आहे. विशेषतः मस्क यांच्या ‘स्टारलिंक’ने रशिया-युक्रेन संघर्षादरम्यान युक्रेनला खूप मदत केली. दुसरीकडे, चीनदेखील टेस्लासाठी एक महत्त्वाचे उत्पादन आणि ग्राहक केंद्र राहिले आहे. अशा परिस्थितीत येणार्या काळात मस्क त्यांच्या व्यवसाय आणि राजकीय संपर्कांद्वारे जागतिक कंपन्यांवर प्रभाव टाकू शकतात. मस्क यांचे अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ सोबत चांगले संबंध आहेत. ‘स्पेसएक्स’च्या माध्यमातून मस्क यांनी सरकारी खर्च वाचवून ‘नासा’चे काम खूप सोपे केले आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अंतराळवीरांना नेण्यासाठी वापरल्या जाणार्या ‘स्पेसएक्स’च्या ड्रॅगन अंतराळयानाने ‘नासा’चा नफा वाढवला आहे. यामुळे ‘स्पेसएक्स’ला कोट्यवधींची सरकारी कंत्राटे मिळाली आहेत. अशा परिस्थितीत ट्रम्प यांनी मस्क यांचे सरकारी कंत्राट रद्द करून करोडो रुपये वाचवता येतील, असा इशारा दिला, तेव्हा मस्क यांनी असे पाऊल उचलण्याचे आव्हान दिले. ट्रम्प यांची गुपिते उघड करून मस्क हानी पोहोचवू शकतात. त्यांच्याकडे अनेक गुपिते असू शकतात, असे म्हटले जात असल्यामुळे ट्रम्प अस्वस्थ होऊ शकतात आणि त्यांची प्रतिमा खराब होऊ शकते.
(लेखक राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
09 Jul 2025
पहिल्या सहकार विद्यापीठाची गुजरातमध्ये पायाभरणी
05 Jul 2025
जालना जिल्ह्यात पोकरा योजनेतील अनियमितता प्रकरणी चौकशी सुरू
09 Jul 2025
विधानसभेच्या सर्व जागा लढवणार : पासवान
07 Jul 2025
संजोग गुप्ता आयसीसीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी
08 Jul 2025
केरळमध्ये अडकलेल्या एफ-३५ विमानाची दुरुस्ती अशक्य
04 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
09 Jul 2025
पहिल्या सहकार विद्यापीठाची गुजरातमध्ये पायाभरणी
05 Jul 2025
जालना जिल्ह्यात पोकरा योजनेतील अनियमितता प्रकरणी चौकशी सुरू
09 Jul 2025
विधानसभेच्या सर्व जागा लढवणार : पासवान
07 Jul 2025
संजोग गुप्ता आयसीसीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी
08 Jul 2025
केरळमध्ये अडकलेल्या एफ-३५ विमानाची दुरुस्ती अशक्य
04 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
09 Jul 2025
पहिल्या सहकार विद्यापीठाची गुजरातमध्ये पायाभरणी
05 Jul 2025
जालना जिल्ह्यात पोकरा योजनेतील अनियमितता प्रकरणी चौकशी सुरू
09 Jul 2025
विधानसभेच्या सर्व जागा लढवणार : पासवान
07 Jul 2025
संजोग गुप्ता आयसीसीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी
08 Jul 2025
केरळमध्ये अडकलेल्या एफ-३५ विमानाची दुरुस्ती अशक्य
04 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
09 Jul 2025
पहिल्या सहकार विद्यापीठाची गुजरातमध्ये पायाभरणी
05 Jul 2025
जालना जिल्ह्यात पोकरा योजनेतील अनियमितता प्रकरणी चौकशी सुरू
09 Jul 2025
विधानसभेच्या सर्व जागा लढवणार : पासवान
07 Jul 2025
संजोग गुप्ता आयसीसीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी
08 Jul 2025
केरळमध्ये अडकलेल्या एफ-३५ विमानाची दुरुस्ती अशक्य
04 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
4
एक देश, एक भाषा सूत्राचे अपयश
5
यादी सुधारण्याची घाई (अग्रलेख)
6
कोलकाता अत्याचार प्रकरण