केरळमध्ये अडकलेल्या एफ-३५ विमानाची दुरुस्ती अशक्य   

तिरुअनंतपुरम : अमेरिकन बनावटीचे ब्रिटन हवाई दलाचे एफ-३५ हे लढाऊ विमान मागील १९ दिवसांपासून तिरुअनंतपुरम विमानतळावर अडकून पडले आहे. १४ जून रोजी खराब हवामान आणि तांत्रिक बिघाडामुळे हे विमान आपत्कालीन स्थितीत उतरविण्यात आले होते. या विमानातील बिघाड दुरुस्त करण्यात ब्रिटन हवाई दलाच्या तंत्रज्ञांना यश आले नाही. त्यामुळे विमानाचे भाग वेगळे करून ते ब्रिटनला परत घेऊन जाण्याची योजना आहे.
 
या विमानाने केरळच्या किनार्‍यापासून १०० सागरी मैल दूर असलेल्या ब्रिटिश विमानवाहू नौकेवरून उड्डाण केले होते. खराब हवामान आणि इंधन कमी झाल्याने त्याला तिरुवनंतपुरममध्ये उतरवण्यात आले. या विमानाच्या हायड्रॉलिक सिस्टीममध्ये बिघाड होता. तांत्रिक बिघाड ठीक करण्यासाठी ब्रिटन हवाई दलाने  अभियंत्यांचे पथक भारतात पाठविले होते, मात्र त्यांनाही विमानातील बिघाड ठीक करता आला नाही. त्यामुळेच आता या विमानाचे भाग वेगळे करुन ब्रिटनला पाठवण्याच्या हालचाली सुरू आहेत. हे पाचव्या पिढीतील अत्याधुनिक लढाऊ विमान असून, त्याची किंमत जवळपास ९५० कोटी रुपये आहे.
 

Related Articles