विधानसभेच्या सर्व जागा लढवणार : पासवान   

पाटणा : एनडीएचा भाग असलेले लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी बिहारमधील २४३ जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. 
 
छपरा येथे ’नव संकल्प महासभे’ला संबोधित करताना पासवान म्हणाले, या वर्षीच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. मला अनेकजण विचारत आहेत की, आपला पक्ष किती जागा लढवणार?. विरोधक आपल्या मार्गात अडथळे आणत असले तरी आमचा पक्ष बिहारमधील २४३ विधानसभा जागांवर निवडणूक लढवेल. दरम्यान, पासवान यांच्या या घोषणेमुळे सत्ताधारी भाजप-जेडीयूच्या अडचणी वाढवू शकतात.
 
दरम्यान, चिराग पासवान यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारच्या हाजीपूर मतदारसंघातून आरजेडीचे शिवचंद्र राम यांचा १ लाख ७० हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता. 
 

Related Articles