पहिल्या सहकार विद्यापीठाची गुजरातमध्ये पायाभरणी   

आनंद : गुजरातच्या आणंद जिल्ह्यात देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठ सुरू होणार आहे. त्याची पायाभरणी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते शनिवारी झाली.जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेच्या आवारात काल कार्यक्रम झाला. या वेळी मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल, केंद्रीय सहकार राज्यमंत्री किशन पाल गुर्जर आणि नागरी विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. 
 
धार्मिक पूजा करुन शीलालेखाचे अनावरण शहा यांच्या हस्ते झाले. अमूलचे संस्थापक आणि देशातील सहकार चळवळीतील अग्रणी त्रिभुवनदास काशीभाई पटेल यांचे नाव विद्यापीठाला देण्यात येणार आहे. ते त्रिभुवन सहकारी विश्वविद्यालय या नावाने ओळखले जाणार आहे. सहकार क्षेत्रासाठी आवश्यक व्यावसायिक आणि प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचे काम केले जाणार आहे. सुमारे २० लाख जणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामध्ये  पुढील पाच वर्षांत प्राथमिक कृषी कर्ज सोसायट्या, दुग्धालये, मत्स्य उद्योग आदींचा समावेश आहे. सहकार व्यवस्थापन, अर्थ, कायादा आणि ग्रामीण विकासासाठी विशेष शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनाच्या संधी उमेदवरांना मिळणार आहे. 

Related Articles