संजोग गुप्ता आयसीसीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी   

दुबई : भारतीय पत्रकार संजोग गुप्ता यांची सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली. आयसीसी अध्यक्ष जय शाह यांच्या नेतृत्वाखाल गुप्ता यांची निवड करण्यात आली.  
 
गुप्ता ऑस्ट्रेलियाचे जेफ अलार्डिस यांची जागा घेतील, अलार्डिस यांनी वैयक्तिक कारणांमुळे या वर्षाच्या सुरुवातीला चॅम्पियन्स चषकापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आतापर्यंत जिओस्टारमध्ये सीईओ (क्रीडा) म्हणून गुप्ता कार्यरत होते. आता ते आयसीसीचे सातवे सीईओ असतील. या पदासाठी २५ देशांमधून दोन हजार ५०० हून अधिक अर्ज आले होते, त्यापैकी १२ उमेदवारांची निवड करण्यात आली होती. 

Related Articles