कान्स चित्रपट महोत्सव म्हणजे नक्की काय ?   

पॅरिस : फ्रान्समध्ये १३ मे ते २४ मे दरम्यान एक अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होतो. या महोत्सवाला जगभरातील नामांकित अभिनेत्री, अभिनेते  उपस्थिती लावतात. इतका प्रतिष्ठेचा आणि ग्लॅमर असलेला हा सोहळा म्हणजे नक्की काय आहे? या सोहळ्याला जगभरातील सेलिब्रेटी आकर्षक रंगबिरंगी पेहरावात उपस्थिती का लावतात? याविषयी थोडक्यात माहिती घेऊ.  
 
जगातील सर्वात प्रतिष्ठेचा समाजाला जाणारा चित्रपट महोत्सव म्हणजे 'कान्स चित्रपट महोत्सव'. हा चित्रपट महोत्सव दरवर्षी फ्रान्समधील कान्स या शहरात आयोजित केला जातो. यंदा या महोत्सवाचे ७८ वे वर्ष आहे. हा महोत्सव बारा दिवस चालतो. या महोत्सवात काही चित्रपटांचे ग्रँड स्क्रीनिंग केले जाते. 

सुरुवात कोणी आणि का केली ?

या कान्स चित्रपट महोत्सवाची सुरुवात फ्रान्समधील सरकार आणि चित्रपट उद्योजकांनी मिळून केली. या महोत्सवाचा उद्देश्य जगभरातील विविध देशांच्या संस्कृतींना चित्रपटांद्वारे प्रोत्साहन देणे हा आहे. नव्या प्रतिभावंतांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. जगभरातील देशांना त्यांच्या संस्कृतींना चित्रपटांद्वारे एकमेकांच्या जवळ आणणे हा आहे.  त्यावेळी इटलीतील 'व्हेनिस चित्रपट महोत्सव' लोकप्रिय होता. त्यानांतर फ्रांसने असा महोत्सव सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली. याद्वारे कला आणि स्वतंत्र सिनेमा यांना प्राधान्य देईल. याच उद्देश्यांना धरून कान चित्रपट महोत्सवाचा पाया रचला गेला. 
 
कान्स चित्रपट महोत्सव हा केवळ चित्रपटांचा उत्सव नाही, तर तो कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेचा एक अनोखा संगम आहे जो दरवर्षी जगभरातील लोकांना प्रेरणा देतो. याच कलेचा वापर करून आकर्षक पेहराव करून सेलिब्रेटी अभिनेते आणि अभिनेत्री या चित्रपट महोत्सवाला उपस्थित राहतात. फ्रान्समधील कान्स या सुंदर शहरात दरवर्षी कान्सचे आयोजन केले जाते. हा महोत्सव चित्रपट निर्माते, अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रेमींसाठी नवीन आणि सर्जनशील चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ आहे.

उद्देश्य 

दरवर्षी मे महिन्यात कान्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित केला जातो, त्याचे उद्दिष्ट नवीन चित्रपट जगासमोर आणणे आहे. या महोत्सवात जगभरातील सर्वोत्तम चित्रपट दाखवले जातात, ज्यापैकी बऱ्याच जणांना पुरस्कार मिळतात, ज्यात सर्वोच्च पुरस्कार पाम डी'ओरचा समावेश आहे. एका अर्थाने, हा महोत्सव सिनेमाच्या कलेचा सन्मान करण्यासाठी आणि सर्जनशीलता, कथाकथन आणि सिनेमॅटिक तंत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे.

कान्स चित्रपट महोत्सव कधी सुरू झाला?

कान्स चित्रपट महोत्सवाची सुरुवात १९४६ मध्ये झाली. पहिला महोत्सव २० सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर १९४६ या कालावधीत झाला. १९३९ मध्ये सुरू करण्याचे नियोजन असले तरी दुसऱ्या महायुद्धामुळे तो पुढे ढकलावा लागला. 

चित्रपट अग्रस्थानी 

कान्स चित्रपट निर्माते, वितरक आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणते, नवीन चित्रपटांसाठी करार आणि सहयोग तयार करते. सांस्कृतिक देवाणघेवाण होते. वेगवेगळ्या देशांतील चित्रपट एकाच व्यासपीठावर एकत्र येतात, ज्यामुळे जागतिक सांस्कृतिक समज वाढते. कान्स चित्रपट महोत्सव हा रेड कार्पेट, ग्लॅमर आणि सेलिब्रिटींबद्दल आहे, परंतु त्याचे खरे महत्त्व त्याच्या चित्रपटांमध्ये आहे. मुख्य स्पर्धेव्यतिरिक्त, नवीन दिग्दर्शकांचे चित्रपट, लघुपट आणि स्वतंत्र चित्रपटांनाही येथे स्थान मिळते. कान्समध्ये भारतीय चित्रपटांचेही अनेकदा कौतुक झाले आहे.

Related Articles