E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
टेम्बा बावुमाकडे दक्षिण आफ्रिका संघाचे कर्णधारपद
Wrutuja pandharpure
16 May 2025
केपटाऊन
: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेने अंतिम सामन्यासाठी आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. हा सामना ११ ते १५ जून दरम्यान इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल. डोपिंगमुळे नुकतीच बंदी घालण्यात आलेला कागिसो रबाडा संघात परतला आहे, तर संघाचे नेतृत्व टेम्बा बावुमा करेल.
दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीत दुखापतीतून परतलेला लुंगी एनगिडीचाही समावेश आहे. मार्को जॉन्सन, कॉर्बिन बॉश आणि विआन मुल्डर हे वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करताना दिसतील. मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांचा असा विश्वास आहे की त्यांचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पूर्णपणे तयार आहे, त्यात कोणतीही कमतरता नाही. २०२३-२५ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने एकूण १२ कसोटी सामने खेळले, त्यापैकी ८ सामने जिंकले आणि ६९.४४ गुणांची टक्केवारी गाठली.
दक्षिण आफ्रिका, टेबल टॉपर असल्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. डोपिंग टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्यानंतर कागिसो रबाडावर एक महिन्याची बंदी घालण्यात आली होती. चौकशीत असे दिसून आले की त्याने टी-२० लीगपूर्वी कोकेनचे सेवन केले होते. याच कारणास्तव, तो आयपीएल २०२५ मध्येच सोडून घरी परतला. ड्रग टेस्टमध्ये अपयशी ठरल्यामुळे त्याच्यावर एक महिन्याची बंदी घालण्यात आली होती, चांगली गोष्ट म्हणजे तो अजिंक्यपद कसोटीच्या अंतिम सामन्यासाठी संघात परतला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ
टेम्बा बावुमा (कर्णधार), एडेन मार्कराम, लुंगी एनगिडी, टोनी डी जियोर्गी, डेव्हिड बेडिंगहॅम, केशव महाराज, ट्रिस्टन स्टब्स, कॉर्बिन बॉश, सेनुरन मुथुसामी, मार्को जॉन्सन, कागिसो रबाडा, काइल व्हेरेन, डेन पॅटरसन, वियान मुल्डर, रायन रिकेल्टन.
Related
Articles
ईशान्येकडील राज्यांत पावसाचे थैमान
05 Jun 2025
टाव्हरेवाडीच्या ग्रामस्थांना अर्धवट पुलाच्या कामाचा मनस्ताप
30 May 2025
पावसाचा हजारो पर्यटकांना फटका
03 Jun 2025
पुण्यात जोरदार पाऊस
05 Jun 2025
रशियन क्रूड तेलाचा पुरवठा वाढला
03 Jun 2025
भारतीय युवा फलंदाज चमकले
04 Jun 2025
ईशान्येकडील राज्यांत पावसाचे थैमान
05 Jun 2025
टाव्हरेवाडीच्या ग्रामस्थांना अर्धवट पुलाच्या कामाचा मनस्ताप
30 May 2025
पावसाचा हजारो पर्यटकांना फटका
03 Jun 2025
पुण्यात जोरदार पाऊस
05 Jun 2025
रशियन क्रूड तेलाचा पुरवठा वाढला
03 Jun 2025
भारतीय युवा फलंदाज चमकले
04 Jun 2025
ईशान्येकडील राज्यांत पावसाचे थैमान
05 Jun 2025
टाव्हरेवाडीच्या ग्रामस्थांना अर्धवट पुलाच्या कामाचा मनस्ताप
30 May 2025
पावसाचा हजारो पर्यटकांना फटका
03 Jun 2025
पुण्यात जोरदार पाऊस
05 Jun 2025
रशियन क्रूड तेलाचा पुरवठा वाढला
03 Jun 2025
भारतीय युवा फलंदाज चमकले
04 Jun 2025
ईशान्येकडील राज्यांत पावसाचे थैमान
05 Jun 2025
टाव्हरेवाडीच्या ग्रामस्थांना अर्धवट पुलाच्या कामाचा मनस्ताप
30 May 2025
पावसाचा हजारो पर्यटकांना फटका
03 Jun 2025
पुण्यात जोरदार पाऊस
05 Jun 2025
रशियन क्रूड तेलाचा पुरवठा वाढला
03 Jun 2025
भारतीय युवा फलंदाज चमकले
04 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी