E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुण्यात जोरदार पाऊस
Wrutuja pandharpure
07 Jun 2025
पुणे
: शहरासह उपनगरात पडलेल्या जोरदार पावसामुळे पुणेकरांची शुक्रवारी गैरसोय झाली. मध्यवस्तीतील विविध बाजारपेठेतील व्यवहार काही काळ विस्कळीत झाले. रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने वाहन चालकांसह पादचार्यांना आडोशाला थांबावे लागले. पाऊस थांबल्यानंतर रस्त्यावरील वाहत्या पाण्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सुमारे ३.३० च्या दरम्यान जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे काही मिनिटांतच रस्त्यांवरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली. पावसाच्या मार्यामुळे वाहन चालकांना वाहने कडेला लावून आडोशाला थांबावे लागले. महात्मा फुले मंडई, तुळशीबाग, लक्ष्मी रस्त्यावरील सराफी व कापड बाजार, बोहरीआळी, डेक्कन परिसरातील बाजारपेठेतील व्यवहार विस्ळकीत झाले. मध्य वस्तीतील बहुतांश रस्त्यांवरील वाहनांसह पादचार्यांची संख्या घटली. पावसामुळे अनेकांनी कार्यालयासह घराबाहेर पडणे टाळले. त्यामुळे रस्ते रिकामे
झाले होते.
पाऊस थांबल्यानंतर मात्र एकाच वेळी रस्त्यांवर वाहने आली त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. चौकाचौकांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. मध्य वस्तीतील लहान मोठ्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री उशीरापर्यंत रस्त्यांवर पाणी कायम होते. वाहत्या पाण्यात खड्ड्यांच्या अंदाज येत नसल्यामुळे वाहन चालकांना अंदाज घेत वाहन चालवावे लागत होते. त्यामुळे कार्यालये सुटल्यानंतर घराकडे निघालेल्या पुणेकरांना वाहतूक कोंडीमुळे उशीर झाला. पाऊस थांबल्यानंतरही ढगाळ वातावरण कायम होते. आज शहरात ढगाळ वातावरणासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान, मान्सूनची उत्तर सीमा स्थिर आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून उत्तर अंतर्गत कर्नाटकमार्गे तेलंगणा ओलांडून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत समुद्र सपाटीपासून दीड किलो मीटर उंचीवर एक द्रोणीका रेषा जात आहे. कोकण, गोव्यात आजपासून पुढील सहा दिवस काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तीन दिवस काही ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, विदर्भात पुढील चार दिवस काही ठिकाणी मेघगर्जना व वीजांच्या कडकडाट पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. पुढील २४ तासात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तपमानात मोठा बदल होणार नाही. त्यानंतर तपमानात २ ते ३ अंशाने वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. विदर्भात पुढील चार दिवसांनंतर ४ ते ५ अंशाने तपमानात वाढ होणार आहे. राज्यात आज बहुतांश ठिकाणी मेघगर्जना व वीजांच्या कडकडाट आणि वादळी वार्यासह जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.
शहरात पडलेला पाऊस
ठिकाण
पाऊस
लोहगाव
३९.८ मिमी
पाषाण
१९.८ मिमी
शिवाजीनगर १५.२ मिमी
एनडीए
७.५ मिमी
धरण क्षेत्रात पडलेला पाऊस
धरण
पाऊस
टीएमसी
टक्केवारी
खडकवासला
३ मिमी
०.७८
३९.२९
पानशेत
१९ मिमी
१.७५
१६.४२
वरसगाव
१७ मिमी
२.७६
२१.५६
टेमघर
०० मिमी
०.१८
४.८०
एकूण
३९ मिमी
५.४७
१८.७५
Related
Articles
मोटारीच्या धडकेत पादचारी तरूणीचा मृत्यू
14 Jun 2025
जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास
18 Jun 2025
मला फोन करून निवृत्ती घ्यायला सांगितली
17 Jun 2025
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
पूल धोकादायक होता तर प्रवेशबंदी का नाही?
17 Jun 2025
नाशिक शहर, पुणे ग्रामीण यांची मुलींमध्ये, तर उस्मानाबाद, परभणी यांची मुलांमध्ये उपउपांत्य फेरीत धडक
18 Jun 2025
मोटारीच्या धडकेत पादचारी तरूणीचा मृत्यू
14 Jun 2025
जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास
18 Jun 2025
मला फोन करून निवृत्ती घ्यायला सांगितली
17 Jun 2025
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
पूल धोकादायक होता तर प्रवेशबंदी का नाही?
17 Jun 2025
नाशिक शहर, पुणे ग्रामीण यांची मुलींमध्ये, तर उस्मानाबाद, परभणी यांची मुलांमध्ये उपउपांत्य फेरीत धडक
18 Jun 2025
मोटारीच्या धडकेत पादचारी तरूणीचा मृत्यू
14 Jun 2025
जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास
18 Jun 2025
मला फोन करून निवृत्ती घ्यायला सांगितली
17 Jun 2025
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
पूल धोकादायक होता तर प्रवेशबंदी का नाही?
17 Jun 2025
नाशिक शहर, पुणे ग्रामीण यांची मुलींमध्ये, तर उस्मानाबाद, परभणी यांची मुलांमध्ये उपउपांत्य फेरीत धडक
18 Jun 2025
मोटारीच्या धडकेत पादचारी तरूणीचा मृत्यू
14 Jun 2025
जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास
18 Jun 2025
मला फोन करून निवृत्ती घ्यायला सांगितली
17 Jun 2025
‘लीड्स’ कसोटीपूर्वी भारतीय संघात बदल?
17 Jun 2025
पूल धोकादायक होता तर प्रवेशबंदी का नाही?
17 Jun 2025
नाशिक शहर, पुणे ग्रामीण यांची मुलींमध्ये, तर उस्मानाबाद, परभणी यांची मुलांमध्ये उपउपांत्य फेरीत धडक
18 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !