रशियन क्रूड तेलाचा पुरवठा वाढला   

मे महिन्यात प्रति दिवशी १.९६ दशलक्ष पिंपांची भारतात आयात 

नवी दिल्ली : रशियाकडून भारतातील क्रूड तेलाची आयात गेल्या दहा महिन्यांचा विचार करता सर्वाधिक झाली आहे. मे महिन्यात प्रति दिवशी १.९६ दशलक्ष पिंपाची आयात झाली आहे. जागतिक बाजारपेठेचा विचार करता ते अधिक सवलतीच्या दरात उपलब्ध होत आहे, असे जहाज वाहतुकीची आकडेवारी गोळा करणार्‍या केप्लर संस्थेने म्हटले आहे 
 
भारत हा जागातील तिसरा मोठा तेल आयातदार आणि तेलाचा वापर करणारे देश आहे. परदेशातून कूड तेलाचे सुमारे ५.१ दशलक्ष पिंप आयात करत आहे. शुद्धिकरण कारखान्यात या क्रूड तेलावर प्रक्रिया करुन नंतर पेट्रोल आणि डिझेलची निर्मिती केली जाते. 
 
रशिया क्रूड तेलाचा सर्वात मोठा पुरवठदार देश ठरला आाहे. एकंदरीत तेल पुरवठ्यात त्याचा वाटा ३८ टक्के आहे. त्या पाठोपाठ दुसर्‍या क्रमांकावर इराक असून तो १.२ दशलक्ष पिंप प्रति दिवशी भारताला पुरवतो. सौदी अरेबिया ६ लाख १५ हजार पिंप तर संयुक्त अरब अमिरात ४ लाख ९० हजार पिंप, अमेरिका पाचव्या क्रमांकावर असून तो २ लाख ८० हजार पिंपाचा पुरवठा करतो.
 
एकंदरीत भारताची क्रूड तेलाची आयात मे महिन्यात सर्वाधिक आहे. कारण तेलाचे दर आणि विविध माध्यमातून ते आयात केले जाते.दुसरीकडे आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता रशिया मोठ्या प्रमाणात क्रूड तेलाची निर्यात भारताला करत आहे. भारताला देखील क्रूड तेल सवलतीच्या दरात प्राप्त होत आहे, अशी माहिती केप्लरचे ज्येष्ठ विश्लेषक सुमित रितोलिया यांनी सांगितले.  
 
भारताची क्रूड तेलाची पारंपरिक आयात पश्चिम आशियातून केली जात होती. रशिया आणि युक्रेनमध्ये फेब्रुवारी २०२२ मध्ये युद्धाचा भडका उडाला. त्यानंतर पाश्चात्य आणि युरोपीयन देशांनी रशियावर आर्थिक प्रतिबंध लादले. यानंतर आर्थिक कोंडीवर मात करण्यासाठ रशियाने सवलतीच्या दरात क्रूड तेलाची निर्यात सुरू केली. भारताकडूनही तेलाची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यास सुरुवात झाली. प्रारंभी प्रमाण एक टक्के होते. आता  ते ४० ते ४४ टक्के वाढले.  

युराल क्रूडचे एक पिंप ५० डॉलरला 

रितोलिया यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारातील ब्रेंट क्रूड, दुबई आणि पश्चिम आशियाकडून निर्यात होणार्‍या क्रूड तेलापेक्षा रशिया भारताला सवलतीच्या दरात पुरवठा करत आहे. क्रूड तेलाने भरलेली जहाजे मोठ्या प्रमाणात भारतात येत आहेत. त्यामागे आर्थिक, पुरवठा आणि भूराजकीय परिस्थितीचा समावेश आहे. रशियातील युराल येथून उत्पादित क्रूड तेल पश्चिम आफ्रिका आणि मध्य पश्चिमेतील तेलाच्या तुलनेत अधिक सवलतीत भारताला प्राप्त होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाचे एक पिंप ६० डॉलरला पडते. युरालचे एक पिंंप रशिया भारताला ५० डॉलरने देतो. एका वेळी २० तेलाचे टँकर येतात. भारत क्रूड तेलाची आयात आता ३० ते ३५ टक्के करत आहेत. .येत्या काही महिन्यांत रशिया प्रति दिवशी १ लाख ते ३ लाख पिंपाची निर्मिती करण्याची योजना आखत आहे. त्यामुळे निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मे नंतर भारतात रशियाकडून होणारा तेलपुरवठा कमी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 
 

Related Articles