E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात २२ मुलांसह ६० जण ठार
Samruddhi Dhayagude
15 May 2025
दीर अल-बला : गाझामध्ये बुधवारी पहाटे इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात २२ मुले ठार झाली, स्थानिक रुग्णालये आणि आरोग्य अधिकार्यांनी ही माहिती दिली. या हल्ल्यांमध्ये एकूण ६० जणठार झाले, ज्यात दक्षिणेकडील खान युनिस शहरातील १० जणांचा समावेश असल्याचे, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
जबालिया येथील इंडोनेशियन रुग्णालयाने सांगितले, की इस्रायलच्या हल्ल्यामध्ये ४८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने केलेल्या करारानुसार आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सौदी अरेबिया भेटीदरम्यान हमासने एका इस्रायल-अमेरिकन ओलिसाची सुटका केली त्याच्या एका दिवसानंतर हे हल्ले झाले.इस्रायली लष्कराने या हल्ल्यांवर भाष्य करण्यास नकार दिला. मंगळवारी उशिरा लष्कराने जबालियाच्या रहिवाशांना परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला, येथे रॉकेट लाँचर्ससह हमासची पायाभूत सुविधा आहे. जबालिया येथील बचाव कर्मचार्यांनी कोसळलेल्या इमारतीच्या ढिगार्याखालून मुलांचे मृतदेह बाहेर काढले.
हल्ले तीव्र करणार
नेतान्याहू यांच्या कार्यालयाने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात, म्हटले आहे, की आम्ही वचन दिल्याप्रमाणे सैन्याची संख्या वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे हमासचा नाश करण्याचे इस्रायलचे ध्येय पूर्ण करण्यासाठी मोठ्या ताकदीने गाझामध्ये प्रवेश करतील.
फ्रान्सकडून निषेध
या आठवड्याच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय अन्न सुरक्षा तज्ज्ञांनी असा कडक इशारा दिला होता, की जर इस्रायलने नाकेबंदी उठवली नाही आणि लष्करी कारवाई थांबवली नाही, तर गाझा पट्टीला दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नेतन्याहू यांच्या गाझाला मदत पुरवठा रोखण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला आणि त्याला अपमानजनक म्हटले. बेंजामिन नेतन्याहू यांचे सरकार आज जे करत आहे ते अस्वीकार्य आहे, असे मॅक्रॉन यांनी मंगळवारी संध्याकाळी सांगितले. गाझामध्ये औषधे संपली आहेत. आपण जखमींना गाझामधून बाहेर काढू शकत नाही. डॉक्टर तिथे जाऊ शकत नाहीत. इस्रायल जे करत आहे, ते चुकीचे आहे.
युद्ध थांबवण्याचा प्रश्नच नाही : नेतान्याहू
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मंगळवारी सांगितले, की इस्रायलने गाझामधील युद्ध थांबवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नेतान्याहू यांच्या या विधानाने युद्धबंदीच्या सर्व आशा संपुष्टात आल्या आहेत.
Related
Articles
वाचक लिहितात
28 May 2025
बेलराईज इंडस्ट्रीज : मराठी उद्योजकाचे आश्वासक पदार्पण
02 Jun 2025
सत्तेत परतण्याची घाई (अग्रलेख)
30 May 2025
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उंदरांचा वावर
03 Jun 2025
लष्कराकडून पुरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी आश्रय
28 May 2025
मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणात आदित्य यांचीही चौकशी करा
29 May 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात