E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
बेलराईज इंडस्ट्रीज : मराठी उद्योजकाचे आश्वासक पदार्पण
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
भाग्यश्री पटवर्धन
बेलराईज इंडस्ट्रीज ही कंपनी दोन, तीन, चार चाकी वाहने, व्यावसायिक वाहने तसेच शेतीवाहनांसाठी सुरक्षितता यंत्रणा व अभियांत्रिकी उत्पादने तयार करते. वाढत्या ईव्ही बाजारातही कंपनीची पकड
मजबूत आहे.
अस्सल मराठी कुटुंबाच्या मालकीचा एखादा उद्योग भांडवली बाजारातून व्यवसाय विस्तारासाठी रक्कम उभारणी करतो आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो ही बाजारातील घटकांसाठी आणि प्रसारमाध्यमांसाठी विशेष बाब मानायला हवी. त्यातील दुसर्या घटकाने म्हणजे माध्यमांनी (निवडक सोडल्यास) फारशी दाखल घेतलेली दिसत नाही. मागील आठवड्यात बडवे कुटुंबाच्या मालकीच्या आणि वाहन उद्योगाला सुटे भाग पुरवणार्या बेलराईज इंडस्ट्रीजने (पूर्वीची बडवे इंजिनियरिंग) भागविक्री केली आणि तो बाजारावर नोंदला गेला. नोंदणीवेळी भाव १०० रुपये होता.
डिझेल-पेट्रोल आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी सुटे भाग तयार करणारी कंपनी बेलराईज इंडस्ट्रीजच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. बीएसईच्या आकडेवारीनुसार तो ४३ पट सबस्क्राइब झाला. गुंतवणूकदार श्रेणीमध्ये, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (छखखी) स्वतःसाठी राखीव असलेल्या श्रेणीपेक्षा ८.९६ पट जास्त गुंतवणूक केली आहे. यानंतर, किरकोळ गुंतवणूकदारांनी १.५४ पट आणि पात्र संस्थात्मक खरेदीदारांनी (टखइी) ०.६९ पट बोली लावली. या इश्यूद्वारे कंपनीला एकूण २,१५० कोटी रुपये उभारायचे आहेत. यासाठी कंपनीने सुमारे २३.८९ कोटी नवीन शेअर्स जारी केले. कंपनीचे विद्यमान गुंतवणूकदार किंवा प्रवर्तक ऑफर फॉर सेल म्हणजेच ओएफएसद्वारे एकही शेअर विकणार नाहीत. किंमत पट्टा <८५ ते <९० होता. किमान एक लॉट १६६ शेअर्सचा होता. इश्यूचा ३५% हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे.
१९९६ मध्ये स्थापन झालेली बेलराईज इंडस्ट्रीज दुचाकी, चारचाकी, व्यावसायिक आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी सुट्या भागांचे उत्पादन करते. भारतातील दुचाकींच्या सुट्या भागांच्या विभागात कंपनीचा २४% वाटा आहे. बाजारपेठेतील आघाडीच्या तीन कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचा बजाज ऑटो, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया, हिरो मोटोकॉर्प, जग्वार लँड रोव्हर आणि रॉयल एनफील्ड मोटर्स सारख्या कंपन्यांसोबत दीर्घकालीन व्यवसाय आहे. बेलराईज इंडस्ट्रीजचे देशातील ८ राज्यांत १५ उत्पादन कारखाने आहेत. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह उत्पादन पोर्टफोलिओमध्ये चेसिस सिस्टम, एक्झॉस्ट सिस्टम, बॉडी-इन-व्हाइट पार्ट्स, पॉलिमर घटक, बॅटरी कंटेनर, सस्पेंशन आणि स्टीअरिंग कॉलम अशा १,००० हून अधिक विविध उत्पादनांचा समावेश आहे.
एनएसईवर पहिल्या दिवशी एकूण १९८५.०७ लाख शेअर्सची खरेदी-विक्री झाली, तर बीएसईवर २०१.७१ लाख शेअर्सची उलाढाल झाली. दोन्ही एक्स्चेंजवर मिळून एकूण उलाढाल २,१३५.७८ कोटी रुपयांवर पोहोचली. बेलराईज इंडस्ट्रीज ही कंपनी दोन, तीन, चार चाकी वाहने, व्यावसायिक वाहने तसेच शेतीवाहनांसाठी सुरक्षितता महत्त्वाच्या असलेल्या यंत्रणा व अभियांत्रिकी उत्पादने तयार करते. वाढत्या ईव्ही बाजारातही कंपनीची पकड मजबूत आहे.
३१ डिसेंबर २०२४ पर्यंत कंपनीने आपले उत्पादन देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विस्तारले आहे. ऑस्ट्रिया, स्लोव्हाकिया, युनायटेड किंगडम, जपान व थायलंड या देशांमध्ये कंपनीचे उत्पादन पोहोचते. कंपनीकडे २९ वाहन उत्पादक कंपन्यांचा विस्तृत ग्राहकवर्ग आहे. मार्च २०२५ मध्ये कंपनीने एच-वन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या जपानमधील सूचिबद्ध कंपनीच्या माजी उपकंपनीचे अधिग्रहण केले. बाजारपेठेत असलेली भक्कम वाटचाल पाहता कंपनीचे भविष्य उत्तम आहे. ज्यांना प्राथमिक भागविक्रीत शेअर मिळाले नाहीत त्यांनी निराश होण्याचे कारण नाही. सध्याचा भाव आकर्षक आहे. तसेच येत्या दोन तिमाहीचे निकाल काय येतात याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.
हा कंटेनर ’डिमॅट’मध्ये पार्क करा
केंद्र सरकारच्या मालकीच्या नवरत्न कंपनीने म्हणजे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने(concor) गेल्या आठवड्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बक्षीस भाग आणि लाभांशाची घोषणा केली आणि गुंतवणूकदारांच्या पारड्यात चांगले माप टाकले आहे. आतापर्यंत कंपनीने चार वेळा बक्षीस भाग जाहीर केले आहेत. २००८-२०१३ , २०१७, २०१८ असे बक्षीस भाग मिळाले आहेत. शेवटच्या दोन तारखा पाहता लागोपाठ बोनस दिला आहे. याचा अर्थ ज्यांनी दीर्घ काळासाठी गुंतवणूक केली त्यांना चांगला परतावा मिळाला आहे. पाच रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर दोन रुपये लाभांश दिला जाणार आहे. लाभांशाची रेकॉर्ड तारीख ६ जून आहे . बोनसची अजून जाहीर झालेली नाही. शेअरचा कमाल किमान भाव (५२- wk high सह १,१८०.०० ५२- wk low ६०१.२५) असा आहे .
Related
Articles
कात्रजचे दूध आता प्रतिलिटर ५७ रुपये
17 Jun 2025
दुसर्यांचा जीव वाचविण्याऐवजी फोटोसाठी सुरु होती धडपड!
17 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
निकोलस पूरनची निवृत्तीची घोषणा
11 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
कात्रजचे दूध आता प्रतिलिटर ५७ रुपये
17 Jun 2025
दुसर्यांचा जीव वाचविण्याऐवजी फोटोसाठी सुरु होती धडपड!
17 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
निकोलस पूरनची निवृत्तीची घोषणा
11 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
कात्रजचे दूध आता प्रतिलिटर ५७ रुपये
17 Jun 2025
दुसर्यांचा जीव वाचविण्याऐवजी फोटोसाठी सुरु होती धडपड!
17 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
निकोलस पूरनची निवृत्तीची घोषणा
11 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
कात्रजचे दूध आता प्रतिलिटर ५७ रुपये
17 Jun 2025
दुसर्यांचा जीव वाचविण्याऐवजी फोटोसाठी सुरु होती धडपड!
17 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
निकोलस पूरनची निवृत्तीची घोषणा
11 Jun 2025
दोस्ताना संपला
15 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक