E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
बुद्ध पौर्णिमेनिमित्त मंगलमय वातावरणात रंगली धम्म पहाट
Wrutuja pandharpure
13 May 2025
पुणे
: बुद्धम् शरणम् गच्छामि, सार्या विश्वाला बुद्ध हवा, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले, अशा बुद्ध-धम्म गीतांनी आणि राष्ट्रीय कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाच्या माध्यमातून बुद्ध-कबीर अन् तुकोबांच्या विचारांचा जागर करत बुद्ध पौर्णिमेची धम्म पहाट मंगलमय वातावरणात रंगली.
जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुध्द जयंती निमित्त विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे ’धम्मपहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुध्द्ध-भिम गीतांनी सजलेला हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालया-समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात पार पडला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, महोत्सव समितीचे सरचिटणीस दीपक म्हस्के, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, श्रामणेर, भंते यांच्यासह बौद्ध अनुयायी उपस्थित होते.
सामूहिक बुद्ध वंदना आणि त्रिशरण पंचशील पठणाने धम्मपहाट कार्यक्रमाला सुरुवात झाली. पहाटेच्या गारव्यात राष्ट्रीय कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी वारकरी आणि बुद्ध विचारांचे नाते उलगडले. वारकरी समाजाचा पाया तथागत गौतम बुद्धाच्या विचारातच असल्याचे सांगताना त्यांनी जगदगुरु संत तुकारामांच्या अभंगाचा बुद्ध तत्वज्ञानाशी असलेला संबंध उपस्थितांना सांगितला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला न्याय आणि समतेचा संदेश देणारे बुद्ध तत्वज्ञान व वारकरी संप्रदायातील संताच्या विचारातून आल्याचेही वाबळे महाराजांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बोलो जय भीम, सरे रात काळी, भारत भू के क्रांती सूर्य को प्रणाम, भीमरायाने किमया ही केली, माझी आजी म्हणायची अशा बुद्ध -भीम गीतांचे सादरीकरण प्रसिद्ध पार्श्वगायक कुणाल वराळे, अनुष्का शिकतोडे, पार्श्वगायिका स्वप्नजा इंगोले, गायक संविधान खरात, गायक स्वप्निल जाधव आणि त्यांच्या वाद्यवृंदाने सादर केले. परशुराम वाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.धम्म पहाट कार्यक्रमाची सांगता पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाची निर्मिती आणि निवेदन दीपक म्हस्के यांचे होते.
Related
Articles
सिंधू दुसर्या फेरीत
04 Jun 2025
सिंध प्रांतात हिंदू धर्मीयांची निदर्शने
03 Jun 2025
डॉ. अजय तावरे याला अटक
30 May 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाची माळ नविद मुश्रीफ यांच्या गळ्यात
31 May 2025
मुंबईतील रिक्षा चालक महिन्याला ५-८ लाख कमवतो
05 Jun 2025
सिंधू दुसर्या फेरीत
04 Jun 2025
सिंध प्रांतात हिंदू धर्मीयांची निदर्शने
03 Jun 2025
डॉ. अजय तावरे याला अटक
30 May 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाची माळ नविद मुश्रीफ यांच्या गळ्यात
31 May 2025
मुंबईतील रिक्षा चालक महिन्याला ५-८ लाख कमवतो
05 Jun 2025
सिंधू दुसर्या फेरीत
04 Jun 2025
सिंध प्रांतात हिंदू धर्मीयांची निदर्शने
03 Jun 2025
डॉ. अजय तावरे याला अटक
30 May 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाची माळ नविद मुश्रीफ यांच्या गळ्यात
31 May 2025
मुंबईतील रिक्षा चालक महिन्याला ५-८ लाख कमवतो
05 Jun 2025
सिंधू दुसर्या फेरीत
04 Jun 2025
सिंध प्रांतात हिंदू धर्मीयांची निदर्शने
03 Jun 2025
डॉ. अजय तावरे याला अटक
30 May 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाची माळ नविद मुश्रीफ यांच्या गळ्यात
31 May 2025
मुंबईतील रिक्षा चालक महिन्याला ५-८ लाख कमवतो
05 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
एनडीएत नवा अध्याय
3
विमा महामंडळाचा विक्रम
4
पती आणि सासू येरवडा कारागृहात
5
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी
6
मराठवाड्यातील ६८० गावांत अतिवृष्टी