E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाची माळ नविद मुश्रीफ यांच्या गळ्यात
Wrutuja pandharpure
31 May 2025
अखेर महायुतीचा अध्यक्ष...
कोल्हापूर
: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये थेट हस्तक्षेप केल्याने महायुतीचा अध्यक्ष झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून गोकुळ अध्यक्षपदावरून बरीच चर्चा रंगली होती. अनेक राजकीय चर्चाना सुद्धा वेग आला होता. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. दरम्यान, नविद यांच्या निवडीला हसन मुश्रीफ यांनी विरोध केला होता. मात्र, त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे गोकुळमध्ये राज्यपातळीवरील हस्तक्षेप दिसून आला.
गेल्या काही दिवसांपासून अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर गोकुळचे राजकारण ढवळून निघाले. त्यामुळे अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? याची चर्चा लागली होती. गोकुळच्या अध्यक्षपदी सर्वसामान्य चेहरा म्हणून गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आले होते. मात्र, पुन्हा एकदा अखेरच्या क्षणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हस्तक्षेप करत महायुतीचा अध्यक्ष झाला पाहिजे अशी भूमिका घेतली. त्यामुळे गुरुवारी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनामध्ये यावर अडीच तास बैठक झाली. या बैठकीमध्ये नेत्यांनी चर्चा करत नाव ठरवत बंद लिफाफ्यातून ज्येष्ठ संचालक माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे ते सुपूर्द केले होते. काल तो लिफाफा खोलण्यात आला. नविद परदेशात असल्याने त्यांना तातडीने कोल्हापुरात बोलवण्यात आल्याने त्यांच्याच नावाची चर्चा सर्वाधिक रंगली होती.
कोल्हापूर जिल्हा बँक आणि ‘गोकुळ’चे अध्यक्षपद घरी आल्याने हसन मुश्रीफ यांची जिल्ह्याच्या राजकारणावर पकड वाढली आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ आहेत. दोन्ही संस्थांचा कारभार जिल्ह्यातील शेतकर्यांच्या थेट चुलीशी जोडला गेला आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी सत्ता जिल्ह्यातील पुढार्यांना हवीच हवी असते. राज्यात महायुती असल्याने सतेज पाटील यांची कोल्हापूरमध्येच कोंडी करण्याचा सुद्धा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून सुरु आहे, हे सुद्धा यानिमित्ताने लपून राहिलेले नाही. अरुण डोंगळे यांचे बंड शांत करण्यात आले तरी महाडिक गटाच्या कोल्हापूर-मुंबई फेर्याही सुरु होत्या. त्यामुळे गोकुळमध्ये वेगळे काही घडणार का? अशीही चर्चा रंगली. मात्र, संचालकांनी एकजूट दाखवल्याने त्याचा फारसा परिणाम झाला नाही.
Related
Articles
महामार्गावरील हॉटेल थांब्यांना सरनाईक यांची भेट
12 Jun 2025
शालेय बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करा
12 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
जोरदार पावसामुळे पुण्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप
14 Jun 2025
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
13 Jun 2025
महामार्गावरील हॉटेल थांब्यांना सरनाईक यांची भेट
12 Jun 2025
शालेय बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करा
12 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
जोरदार पावसामुळे पुण्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप
14 Jun 2025
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
13 Jun 2025
महामार्गावरील हॉटेल थांब्यांना सरनाईक यांची भेट
12 Jun 2025
शालेय बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करा
12 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
जोरदार पावसामुळे पुण्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप
14 Jun 2025
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
13 Jun 2025
महामार्गावरील हॉटेल थांब्यांना सरनाईक यांची भेट
12 Jun 2025
शालेय बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करा
12 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
जोरदार पावसामुळे पुण्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप
14 Jun 2025
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक