ड्रोन हल्ल्यात चार सैनिक जखमी   

पाकिस्तानचा दावा

इस्लामाबाद/लाहोर : भारतीय सशस्त्र दलाने केलेल्या ड्रोन हल्ल्यात चार सैनिक जखमी झाले, असा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. तसेच, भारताचे अनेक ड्रोन आम्ही पाडले, असेही पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानने लष्करी ठिकाणांवर केलेला हल्ल्याचा प्रयत्न भारतीय सशस्त्र दलांनी हाणून पाडला. त्यामुळे, पाकिस्तान आता भारताच्या ड्रोन हल्ल्यात चार सैनिक जखमी झाले, असा दावा करत आहे.
 
पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले की, लाहोरजवळ एक ड्रोन कोसळला. यामध्ये चार सैनिक जखमी झाले. अन्य एका अधिकार्‍याने लाहोर कॅन्टोन्मेंट परिसरात किमान चार ड्रोन कोसळले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, असे सांगितले. दरम्यान, लाहोर, गुजरांवाला, चकवाल, बहावलपूर, मियानो, कराची, चोर, रावळपिंडी आणि अटकजवळ १२ ड्रोन आम्ही नष्ट केले, असे चौधरी यांनी सांगितले.

Related Articles