हमासचा गाझा प्रमुख महमद सिनवार ठार   

नेतान्याहू यांची घोषणा  

जेरूसलेम : इस्रायली सैन्याने हमासचा गाझा प्रमुख महम्मद सिनवार याला ठार केल्याची घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरूवारी केली. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार सिनवार होता. १४ मे रोजी इस्रायली सैन्याने खान युनूसमधील युरोपियन रूग्णालयाच्या खाली असलेल्या एका भूमिगत कमांड सेंटरला लक्ष्य केले. या कमांड सेंटरमध्ये   सिनवार लपला होता. या हल्ल्यात सिनवार जखमी झाला होता. आता त्याचा मृत्यू झाल्याचे नेतान्याहू यांनी म्हटले आहे. दरम्यान,  सिनवार याच्या मृत्यूबद्दल हमासने अद्याप अधिकृत पुष्टी केलेली नाही.

मागील वर्षी सिनवारच्या भावाची हत्या 

इस्रायली सैन्य गेल्या अनेक वर्षांपासून मोहम्मद सिनवारचा शोध घेत होते. तो याह्या सिनवारचा धाकटा भाऊ होता. १६ ऑक्टोबर रोजी रफाहमध्ये इस्रायली सैन्याने याह्या सिनवारला ठार मारले. सिनवारच्या मृत्यूनंतर हमासचे अस्तित्वच धोक्यात आले होते.

Related Articles