इस्रायलचे सात सैनिक गाझातील स्फोटात ठार   

जेरूसालेम : दक्षिण गाझातील खान युनूस शहरातील स्फोटात इस्रायलचे सात सैनिक मंगळवारी ठार झाले. सैनिक प्रवास करत असलेल्या एका लष्करी वाहनावर स्फोटक आदळले होते. 
इस्रायलच्या संरक्षण विभागाने सात सैनिकांपैकी सहा जणांची नावे जाहीर केली असून एकाचे नाव गुप्त ठेवले आहे. दरम्यान, ७ ऑक्टोबर २०२३ पासून आतापर्यंत ८६० सैनिक ठार झाले आहेत. पण, आतापर्यंतच्या हल्ल्यातील कालचा हल्ला अधिक मोठा होता. खान युनूस परिसरातील गोळीबारात एका सैनिकाचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी हमासची लष्करी संघटना अल कासिम ब्रिगेडने घेतली आहे. इस्रायली सैनिकांनी आश्रय घेतलेल्या ठिकाणांवर यासिन १०५ क्षेपणास्त्राचा मारा केल्याचे म्हटले आहे. जेथे इस्रायलच्या मशिन गन आहेत. तेथे दहशतवादी आता लक्ष्य करत आहेत. 

Related Articles