त्यांनी जरुर एकत्र यावे...   

मुंबई, (प्रतिनिधी) : राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊ नये, असा जीआर मी काढला आहे का? त्यांनी जरूर एकत्र यावे. एकत्र येऊन क्रिकेट-टेनिस खेळावे, जेवण करावे. आमची काहीच हरकत नाही. ते दोघे एकत्र येणार असतील तर आनंदच आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याच पक्षाच्या उपनेत्याने अहवालात हिंदीची जी शिफारस केली आहे; त्याबद्दल राज ठाकरे यांनी जरूर उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारावा, असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली. रवींद्र चव्हाण यांनी काल भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. त्यावेळी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते. 

Related Articles