पर्यटन उद्योग उध्वस्त करण्यासाठी पहलगाम दहशतवादी हल्ला : जयशंकर   

पर्यटन नष्ट करण्यासाठी रचले कारस्थान 

न्यूयॉर्क : जम्मू आणि काश्मीरचे पर्यटन नष्ट करण्यासाठी पहलगाम येथे  दहशतवादी हल्ला झाला होता. ते एक प्रकारचे आर्थिक युद्ध होते, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मंगळवारी सांगितले. अणुबाँबची धमकीला न जुमानता पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद कठोरपणे नष्ट केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. 
 
मॅनहाटन येथील ९/११ च्या दहशतवादी स्मृतीस्थळाजवळ 'वन वर्ल्ड ट्रेड सेंटर' आहे. या सेंटरच्या मुख्यालयात जयशंकर याची मुलाखत न्यूजवीकचे मुख्य कार्यकारी अधिकारी देव प्रयाग यांनी घेतली.जयशंकर म्हणाले, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे आर्थिक आणि धार्मीक कट्टरतावाद असे दोन पैलू आहेत. दहशतवादी हल्ला करुन जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटन नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पर्यायाने ते एक प्रकारचे आर्थिक युद्ध होते. हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी पुरुष पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन नंतर गोळ्या झाडल्या होत्या. यातून कट्टरतावादाचा धार्मीक पैलू दिसून येतो.  त्यामुळे पहलगामनंतर पाकिस्तानातील दहशतवाद्यांची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी सैन्य कारवाईचा निर्णय भारताने घेतला होता. त्यामाध्यमातून भविष्यातील हल्ल्यांचा घटनांना पायबंद बसेल हा प्रमुख हेतू होता. पुन्हा कुरापत काढली सडेतोड उत्तर दिले जाईल, असा इशारा जयशंकर यांनी या वळी दिला.

Related Articles