दोन वर्षात २२ वाघांचा मृत्यू   

मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यात जानेवारी ते एप्रिल २०२५ या काळात २२ वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी विधानसभेत सादर झालेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरातून पुढे आली आहे. जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२४ या दरम्यान राज्यात विविध कारणांनी १०७ वाघांचा मृत्यू झाल्याचीही आकडेवारी आहे. शिकार, वीजेचा धक्का कुत्र्यांचे हल्ले अशा विविध कारणांमुळे या वाघांचा मृत्यु झाला आहे.
 
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वारंवार होत असलेल्या वन्यप्राण्यांच्या मृत्युबाबत धनंजय मुंडे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील लेखी उत्तरातून ही माहिती पुढे आली आहे.या वर्षातल्या पहिल्या चार महिन्यात राज्यात नैसर्गिक कारणामुळे तेरा वाघांचा मृत्यु झाला. वीजेच्या धक्क्यामुळे चार, रस्ता ओलांडताना, रेल्वे रुळांवर आणि विहिरात पडून वीस, शिकारीत तीन व अज्ञात कारणांमुळे एक अशा व बावीस वाघांचा मृत्यु झाला. राज्यात २०२२ ते २०२४ या काळात विविध कारणांमुळे १०७ वाघांचा मृत्यु झाल्याचीही आकडेवारी आहे.राज्यात ४० बिबट्यांचा मृत्यु झाल्याचीही आकडेवारी पुढे आली आहे. नैसर्गिक कारणामुळे आठ, रस्ते, रेल्वे व विहिर अपघातात वीस, शिकारीमुळे तीन, अज्ञात कारणामुळे ८ बिबटे अशा एकूण चाळीस बिबट्यांचा मृत्यु झाल्याचे निदर्शनास आले आहे.
 
६१ वन्यप्राण्यांचा मृत्यू
 
जानेवारी ते एप्रिल या कालावधीत नैसर्गिक कारणामुळे २३, वीजेच्या धक्क्यामुळे चार, शिकारीत चार, रस्ता, कुत्र्यांचा हल्ला, विहिर अपघात यामुळे २४ आणि अज्ञात कारणामुळे ६१ इतर वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे. तर २०२२ ते २०२४ या काळात राज्यात एकूण ७०७ वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला.यावर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २१ जणांचा मृत्यू झाला असे उत्तरात नमूद केले आहे.

Related Articles