पाकिस्तानात २४६ भारतीय कैदी   

नवी दिल्‍ली /इस्लामाबाद : पाकिस्तानच्या तुरुंगात 246 कैदी आहेत.  भारत आणि पाकिस्तानने द्वैवार्षिक प्रक्रियेचा भाग म्हणून एकमेकांच्या ताब्यात असलेल्या कैद्यांच्या याद्यांची देवाणघेवाण केली. त्यात ही बाब उघड झाली. भारताने 463 पाकिस्तानी  कैद्यांची यादी सोपविली. त्यात 382 नागरिक आणि 81 मच्छिमार आहेत. पाकिस्तानने 246 भारतीय तुरुंगात असल्याची यादी दिली. त्यात 53 नागरिक आणि 193 मच्छीमार आहेत. 
 
 दरम्यान, कैद्यांची माहिती देणार्‍या यादीची देवाणघेवाण 2008 च्या करारानुसार केली जाते. 159 भारतीय कैदी आणि मच्छिमारांची शिक्षा पूर्ण झाली आहे त्यामुळे त्यांना सोपवावे, अशी मागणी केली केली. 26 भारतीय नागरिक आणि मच्छिमारांच्या सुटकेसाठी तातडीने परवानगी द्यावी, असा आग्रह धरला आहे. दरम्यान, भारतीय तुरुंगातील 80 कैदी आणि मच्छिमारांच्या राष्ट्रीयत्व पडताळणीची प्रक्रिया तातडीने करावी, अशी विनंती पाकिस्तानने केली आहे.

Related Articles