व्हॉट्सऍप कट्टा   

एक तरुण बागेत काम करीत होता. सूर्य डोक्यावर आला तरी त्याचे बागकाम संपत नाहीसे पाहून त्याची आई घरातून ओरडली, ‘अरे रामा! ऊन कोण रणरणतं आहे! घरात ये ना? वाटल्यास उरलेलं काम संध्याकाळी कर.’ दोन तीन वेळा सांगूनही आपला मुलगा आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असं पाहून त्या बाईने आपल्या चार-पाच वर्षांच्या नातवाला-म्हणजे उन्हात बागकाम करणार्‍या मुलाच्या मुलाला उचललं आणि बागेत असलेल्या आपल्या मुलापाशी नेऊन ठेवलं. 
आपल्या मुलाला उन्हात आणून ठेवल्याचं पाहून त्याचा पिता आपल्या आईवर भडकून म्हणाला, ‘आई ! अगं ऊन कोण तापलंय! आणि गण्याला तू इथे उन्हात आणून ठेवलंस? त्याला उन्हाचा त्रास नाही का होणार?’ त्या तरुणाची आई मुद्दाम म्हणाली, ‘ऊन लागलं तर लागलं; त्यात विशेष काय आहे?’ तो तरुण म्हणाला, ‘आई! तो माझा मुलगा आहे. त्याला ऊन लागतंय म्हणून नुसता त्यालाच त्रास होत नाही, तर त्याला होणार्‍या त्रासामुळं माझ्याही जिवाची तगमग होऊ लागली आहे.’ 
यावर आई म्हणाली, ‘मग रामा, तू असा विचार कर की, तुझ्या मुलाला ऊन लागताच जशी तुझ्या जिवाची तगमग सुरू झाली, तशीच तगमग तू मघापासून उन्हात काम करीत असल्यामुळे माझ्याही जिवाची तगमग होत नसेल का?’ वृद्ध व प्रेमळ आईचा हा बिनतोड युक्तिवाद ऐकून रामा निमूटपणे कुदळ, कोयती उचलून, बागेतून हसत हसत घरात गेला.
तात्पर्य : स्वत: पालकाच्या भूमिकेत गेल्याशिवाय आईवडिलांचे प्रेम, माया, काळजी कळत नाही.
----
विठुमय होई प्राण
 
साद जलधारांतून
सांगावा मंदिरातून
टाळ-चिपळ्यांचा नाद 
काना मनात घुमून
विठुमय होई प्राण...
 
पेरा भात लवकरी 
चवळी ये बीजांकुरी 
राही सावळा लक्षुन 
विठुमय...
 
देखभाल कुटुंबाची
सोय पिठाची मिठाची
विठु घेईल पाहून
विठुमय...
 
लगबग निघण्याची
योजना ना कपड्यांची
’हरी’ घेई सावरून
विठुमय...
 
नाही पाऊलें थकत 
ग्यान-तुकोबा मुखात
डोईवरी वृंदावन
विठुमय...
 
एक भाव मुखी, मनी 
’आस’ दर्शनाची ध्यानी
श्रीरंगास त्या भेटेन 
विठुमय...
 
फिकीर ऊन- वार्‍याची
ना भिजत्या पावसाची
विठु चरणी लागेन
विठुमय...
 
- कविता मेहेंदळे
मो. ९३२६६ ५७०२७
---------------------------------
युद्ध नको प्रेम हवे
 
आकाशी शस्त्रांची गर्दी, 
कानठळ्या त्या अहोरात्र, 
कोसळलेल्या इमारती, 
भग्न जाहली किती गात्रं
 
आईचा मृतदेह झाकते, 
कुणी लहानगी हाताने, 
नातलगांची कलेवरें, 
कुणी ठेवली ओळीने
 
काय आमचा गुन्हा जाहला, 
इथे जन्मलो कळी काळी, 
अनाथपण भाळी लिहिले, 
कधी देहाची तीं चाळणी
 
का न ये दया तुम्हाला, 
आम्ही नाही का संताने? 
आबाद राही महाल तुमचा, 
उद्ध्वस्त आमची प्राक्तनें
 
- विद्या बोकील 
मो.: ९५४५१९८५९६
--
रात्रीचे अडीच वाजलेले असतात
बायको नवर्‍याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते.....
नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो
नवरा : काय झालं? काय झालं....?
बायको : काही नाही तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात आधी गोळी घ्या, मग झोपा.
------------------------------------------
बायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया :
 
जगातील सगळ्यात उत्कृष्ट माणूस
- तिचे बाबा
जगातील सगळ्यात प्रेमळ स्त्री
- तिची आई
जगातील सगळ्यात हुशार स्त्री - ती स्वत:
जगातील सगळ्यात दु:खी नवरा - तिचा भाऊ
जगातील सगळ्यात मोठी शत्रू -  तिची नणंद
जगातील सगळ्यात सुंदर पुरुष - तिचा मुलगा
जगातील सगळ्यात नशीबवान नवरा - तिच्या बहिणीचा नवरा
जगातील सगळ्यात अडाणी स्त्री
- तिची सासू आणि
आणि जगातील सगळ्यात खराब, कामचोर, स्वार्थी, खोटारडा, कंजूस, बेकार माणूस कोण ?
आता हे देखील सांगायला पाहिजे का?...
 
खूप खूप ताकद लागते
आलेले अपयश  पचवायला,
डोळ्यात आलेले पाणी पुसून
ओठांवर हसू खेळवायला
काहीतरी ध्येय लागतं आपल्याला
आयुष्यात जगायला,
शेवटी अपयशाचीच गरज असते
आयुष्यात खंबीर बनायला.
घर छोट असलं तरी चालेल पण मन मोठ असलं पाहिजे...
 
डोळयातून वाहणारं पाणी
कोणीतरी पाहणारं असावं.
हदयातून येणारं दु:ख 
कोणीतरी जाणणारं असावं. 
मनातून येणार्‍या आठवणी 
कोणीतरी समजणारं असावं.
जीवनात सुख दु:खात
साथ देणारं एक सुंदर नातं असावं. चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही. 
आपल्याला फ़क्त ‘माणसे‘ महत्त्वाची आहेत.
ती पण तुमच्या सारखी!
 

Related Articles