प्रत्युत्तर शुल्काच्या धमकीने जागतिक शेअर बाजारात घसरण   

मनिला : प्रत्युत्तर शुल्क करारासाठी ट्रम्प प्रशासनाने दिलेली अंतिम मुदत संपत आली असून, त्याचे पडसाद जागतिक शेअर बाजारात पाहायला मिळत आहेत. सोमवारी जागतिक शेअर बाजारात घसरण झाली. ब्रिटनचा एफटीएसई १०० हा ०.२ टक्क्यांनी घसरुन ८,८०९.२३ वर आला. 
 
जर्मनीचा डॅक्स निर्देंशांक ०.३ टक्क्यांनी घसरुन २३,८५४.३२ वर आला. याच प्रमाणे पॅरिसच्या शेअर बाजारात पडसाद उमटले. पॅरिसचा सीएसी ४० निर्देशांक ०.१ टक्क्यांनी घसरुन ७,६८८.३४ वर आला. जपानचा निक्केई २२५ हा ०.६ टक्क्यांनी घसरून ३९,५८७.६८, हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक ०.१ टक्क्यांनी घसरून २३,८८७.८३ वर आला. ऑस्ट्रेलियाचा एस अ‍ॅन्ड पी २०० ०.२ हा घसरून ८,५८९.३० वर आला. मात्र, दक्षिण कोरियाचा कोप्सी निर्देशांक ०.२ टक्क्यांनी वाढून ३,०५९.४७, शांघायचा कंपोझिट निर्देशांक ०.१ टक्क्यांनी वाढून ३,४७३.१३ वर पोहोचला.

जपान आणि दक्षिण कोरियावर २५ टक्के कर; भारतासह ब्रिक्स देशांनाही इशारा

सततच्या व्यापार असमतोलाचे कारण देत जपान आणि दक्षिण कोरियामधून आयात होणार्‍या वस्तूंवर २५ टक्के प्रत्युत्तर शुल्क आकारले जाणार असल्याचे ट्रम्प यांनी समाज माध्यमावर सोमवारी जाहीर केले.
 

Related Articles