E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
कसोटीत आफ्रिका अजिंक्य
Wrutuja pandharpure
15 Jun 2025
लंडन
: ज्यांनी त्यांच्या क्रिकेट प्रवासात अनेकदा अंतिम टप्प्यावर येऊन हार पत्करली, त्याच दक्षिण आफ्रिकेने अखेर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर थरारक विजय मिळवत २७ वर्षांचा चोकर्स टॅग पुसून टाकला आणि आयसीसी ट्रॉफीवर दुसर्यांदा आपले नाव कोरले.
टेम्बा बावुमा यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा चार दिवसांत ५ गडी राखून पराभव केला. यासह १९९८ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत विजय न मिळवू शकलेल्या दक्षिण आफ्रिकेने दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात ब्यू वेबस्टरने सर्वाधिक ७२ धावा केल्या, ज्यात ११ चौकारांचा समावेश होता. माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने ६६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने सर्वाधिक पाच बळी घेतले, तर डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सनला तीन बळी घेतले. फिरकी गोलंदाज केशव महाराज आणि एडेन मार्कराम यांनीही प्रत्येकी एक फलंदाज घेतला आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या २१२ धावांवर आटोपला. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची कामगिरीही निराशाजनक होती. परिणामी, संपूर्ण दक्षिण आफ्रिकन संघ १३८ धावांवर सर्व बाद झाले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून डेव्हिड बेडिंगहॅमने सर्वाधिक ४५ धावा केल्या. तर कर्णधार टेम्बा बावुमाने ८४ चेंडूत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३६ धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने सहा विकेट घेतल्या, तर मिचेल स्टार्कला दोन यश मिळाले. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला ७४ धावांची आघाडी मिळाली.
ऑस्ट्रेलियाच्या दुसर्या डावाबद्दल बोलायचे झाले तर, कांगारू संघाचा स्कोअर एकेकाळी सात बळींवर ७३ धावा होता. येथून, यष्टीरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरी आणि मिचेल स्टार्क यांच्या शानदार फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया २०७ धावांपर्यंत पोहोचू शकला. स्टार्कने १३६ चेंडूत ५८ धावा केल्या, ज्यामध्ये पाच चौकारांचा समावेश होता. अॅलेक्स कॅरीने ५० चेंडूत ५ चौकारांसह ४३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडानेही दुसर्या डावात शानदार गोलंदाजी केली आणि चार बळी घेतल्या. तर लुंगी एनगिडीने तीन यश मिळवले. पहिल्या डावातील आघाडीमुळे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला २८२ धावांचे लक्ष्य दिले.२८२ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने दुसर्या डावात ७० धावांवर आपला दुसरा फलंदाज गमावला. येथून एडेन मार्कराम आणि कर्णधार टेम्बा बावुमा यांनी तिसर्या बळीसाठी १४७ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे काम सोपे झाले.
या भागीदारी दरम्यान मार्करामने १०१ चेंडूत ११ चौकारांसह शतक पूर्ण केले. आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा मार्कराम पहिला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ठरला.दुसरीकडे, हॅमस्ट्रिंग दुखापतीशी झुंजत असतानाही टेम्बा बावुमाने शानदार खेळी केली. बावुमाने १३४ चेंडूत ६६ धावा केल्या, ज्यामध्ये पाच चौकारांचा समावेश होता. विरोधी कर्णधार पॅट कमिन्सने बावुमाला धावबाद केले. आपल्या संघाचा विजय निश्चित केल्यानंतर मार्कराम बाद झाला. त्याने २२७ चेंडूत १३६ धावांची सामना जिंकणारी खेळी खेळली.या दरम्यान त्याच्या बॅटमधून १४ चौकार आले. मार्कराम बाद झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी फक्त सहा धावांची आवश्यकता होती. टेम्बा बावुमा यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला आहे. लॉर्ड्सवर अंतिम सामन्यात त्यांनी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा चार दिवसांत ५ गडी राखून पराभव केला.
संक्षिप्त धावफलक
आफ्रिका (दुसरा डाव) : मार्कराम १३६, रेयान रिकल्टन ६, बावुमा ६६, विवान मुडलर २७,स्ट्ब्ज ८, डेविड २१ नाबाद, कायल वॅरने नाबाद ४ अवांतर १४ एकूण ८३.४ षटकांत २८२/५
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : लबुशेन २२, क्वाझा ६, ग्रीन ०, स्मिथ १३, हेड ९, कॅरी ४३, मिचेल स्टार्क ५८, लायन २, हेझलवूड १७ एकूण ६५ षटकांत २०७/१०
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
08 Jul 2025
२१ हजार किलो खिचडीचे भाविकांना वाटप
07 Jul 2025
सिराजने टिपले ६ बळी
06 Jul 2025
विठ्ठलभक्तीतून जनसेवेचे दर्शन
06 Jul 2025
क्रांतिकारक - ठाकूर रोशनसिंह
04 Jul 2025
माउलींच्या जयघोषात दुसरे गोल रिंगण उत्साहात
03 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
08 Jul 2025
२१ हजार किलो खिचडीचे भाविकांना वाटप
07 Jul 2025
सिराजने टिपले ६ बळी
06 Jul 2025
विठ्ठलभक्तीतून जनसेवेचे दर्शन
06 Jul 2025
क्रांतिकारक - ठाकूर रोशनसिंह
04 Jul 2025
माउलींच्या जयघोषात दुसरे गोल रिंगण उत्साहात
03 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
08 Jul 2025
२१ हजार किलो खिचडीचे भाविकांना वाटप
07 Jul 2025
सिराजने टिपले ६ बळी
06 Jul 2025
विठ्ठलभक्तीतून जनसेवेचे दर्शन
06 Jul 2025
क्रांतिकारक - ठाकूर रोशनसिंह
04 Jul 2025
माउलींच्या जयघोषात दुसरे गोल रिंगण उत्साहात
03 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
08 Jul 2025
२१ हजार किलो खिचडीचे भाविकांना वाटप
07 Jul 2025
सिराजने टिपले ६ बळी
06 Jul 2025
विठ्ठलभक्तीतून जनसेवेचे दर्शन
06 Jul 2025
क्रांतिकारक - ठाकूर रोशनसिंह
04 Jul 2025
माउलींच्या जयघोषात दुसरे गोल रिंगण उत्साहात
03 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
4
एक देश, एक भाषा सूत्राचे अपयश
5
यादी सुधारण्याची घाई (अग्रलेख)
6
सिद्धरामय्यांची खुर्ची टिकली (अग्रलेख)