E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
श्री संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचे २३ जूनला प्रस्थान
Samruddhi Dhayagude
22 May 2025
सासवड, (वार्ताहर) : श्री संत सोपानकाका आषाढी वारी पालखी सोहळा पंढरपूर कडे सोमवारी २३ जून रोजी सासवड येथील देऊळवाड्यातून दुपारी ११ वाजता प्रस्थान ठेवणार असून पालखी सोहळा हा ५ जुलै रोजी वाखरी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार असल्याचे श्री सोपानदेव समाधी ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त त्रिगुण गोसावी यांनी सांगितले.
२३ जुन सासवड येथील देऊळवाड्यातुन निघून पिंपळे मार्गे पांगारे येथे मुक्काम होणार आहे. २४ जून रोजी पालखी परिंचे, वीर मार्गे मांडकी येथे भैरवनाथ मंदिरात मुक्काम. २५ जून रोजी जेऊर, निरा मार्गे निंबूत येथे श्री विठ्ठल मंदिरात मुक्काम असणार आहे. २६ जून रोजी पालखी सोहळा निंबूत येथुन निघून वाघळवाडीला दुपारचा विसावा करुन पालखी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, सोमेश्वरनगर येथे रात्रीचा मुक्कामासाठी पोहोचेल.
२७ जून रोजी पालखी सोहळा करंजे पूल, सोरटेवाडी, वडगाव निंबाळकर मार्गे रात्रीचा मुक्कामासाठी कोर्हाळे बु येथे येईल. २८ जून रोजी पालखी कोर्हाळेहून निघून कठीणपूल मार्गे पणदरे येथे दुपारचा विसावा करुन हनुमानवाडी माळेगाव बु. शारदानगर मार्गे बारामती येथील शारदा प्रांगण येथे मुक्काम करणार आहे. २९ जून रोजी पालखी पिंपळीमार्गे दुपारचा विश्रांतीसाठी भवानीनगर येथे येईल व त्यानंतर सणसर मार्गे पालखी लासुर्णे येथे रात्रीचे मुक्कामासाठी पोहोचेल. ३० जून रोजी लालपुरी, कळंब, निमसाखर मार्गे निरवांगी येथे रात्रीचा मुक्काम करून १ जुलै रोजी पालखीचा मुक्काम अकलूज येथे होईल.
२ जुलै रोजी बाबीरपूल व महाळुंग येथे सकाळचा विसावा व श्रीपूर येथे दुपारचा विसावा करुन बोरगाव, माळखांबी मार्गे पालखी बोंडले येथे रात्रीच्या मुक्काम. ३ जुलै रोजी बोंडले येथून दुपारी पालखी मार्गस्थ होऊन दुपारचा विसावा टप्पा येथे होईल व त्या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत सोपान महाराज यांचा बंधू भेट सोहळा झाल्यानंतर रात्रीच्या मुक्कामासाठी भंडी शेगाव येथे जाईल.
४ जुलै रोजी पालखी वाखरी मुक्कामी असेल, वाखरी येथे उभे रिंगण होणार आहे. ५ जुलै रोजी सोहळा पंढरपूर मुक्कामी. पंढरपूर येथील पालखीचा मुक्काम प्रदक्षिणा मार्गावरील तांबड्या मारुती नजिकच्या श्री संत सोपान महाराज पालखी मंडपात राहील. पंढरपूर येथील पाच दिवसांच्या मुक्कामानंतर काला झाल्यावर १० जुलै रोजी दुपारी १-०० वाजता पालखीचा परतीचा प्रवास सुरु होईल. १६ जुलै रोजी पालखी सासवड येथे पोहोचेल.
Related
Articles
कमल हासन राज्यसभेवर जाणार
29 May 2025
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात
03 Jun 2025
संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी विरोधक एकवटले
04 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
मस्क यांनी सोडली ट्रम्प यांची साथ
30 May 2025
महावितरणतर्फे आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे आयोजन
03 Jun 2025
कमल हासन राज्यसभेवर जाणार
29 May 2025
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात
03 Jun 2025
संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी विरोधक एकवटले
04 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
मस्क यांनी सोडली ट्रम्प यांची साथ
30 May 2025
महावितरणतर्फे आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे आयोजन
03 Jun 2025
कमल हासन राज्यसभेवर जाणार
29 May 2025
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात
03 Jun 2025
संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी विरोधक एकवटले
04 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
मस्क यांनी सोडली ट्रम्प यांची साथ
30 May 2025
महावितरणतर्फे आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे आयोजन
03 Jun 2025
कमल हासन राज्यसभेवर जाणार
29 May 2025
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात
03 Jun 2025
संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी विरोधक एकवटले
04 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
मस्क यांनी सोडली ट्रम्प यांची साथ
30 May 2025
महावितरणतर्फे आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे आयोजन
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
आठवडाभरापासून मान्सून स्थिर