E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
कमल हासन राज्यसभेवर जाणार
Samruddhi Dhayagude
29 May 2025
चेन्नई : तामिळनाडूतील सत्ताधारी द्रवीड मुनेत्र कळघमने (द्रमुक) राज्यसभेच्या सहापैकी चार जागा लढविण्याची बुधवारी घोषणा केली. यापैकी, तीन उमेदवारांची घोषणा करतानाच एक जागा अभिनेता कमल हासन यांच्या नेतृत्वाखालील मित्रपक्ष मक्कल नीधी मय्यमसाठी सोडली. दरम्यान, मक्कल नीधी मय्यमने (एमएनएम) देखील पक्षाचे अध्यक्ष कमल हासन हे १९ जून रोजी होणार्या राज्यसभा निवडणुकीचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली.एमएनएमचे सरचिटणीस ए. अरुणाचलम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हासन यांना राज्यसभेवर पाठविण्याचा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी हासन यांचे अभिनंदन केले.
तामिळनाडूतील ६ आणि आसाममधील ४ राज्यसभा जागांसाठी १९ जून रोजी निवडणूक होणार आहे. द्रमुकने सहापैकी चार जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील एक जागा कमल हासन यांच्या पक्षाला देण्यात आली आहे. तर, अन्य तीन जागांसाठी द्रमुकने विद्यमान राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ वकील पी. विल्सन यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. यासोबतच, पक्षाचे सालेम येथील नेते एस.आर. शिवलिंगम, लेखक आणि पक्षाचे पदाधिकारी रुकाया मलिक उर्फ कविनगर सलमा यांनाही उमेदवारी जाहीर केली.सत्ताधारी द्रमुकचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कमल हासन यांच्या एमएनएमने द्रमुकला साथ दिली होती. त्यावेळी द्रमुकने कमल हासन यांना लोकसभा निवडणुकीचा प्रस्ताव दिला होता. पण, त्यांनी तो नाकारला होता.
तामिळनाडूतील राज्यसभा सदस्य अंबुमणी रामदास (पट्टाली मक्कल काची), एन. चंद्रशेखरन (एआयएडीएमके), एम. षणमुगम (डीएमके), पी विल्सन (द्रमुक) आणि वायको (एमडीएमके) यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. तर, आसाममधील बिरेंद्र प्रसाद बैस्य (भाजप) आणि मिशन रंजन दास (भाजप) या सदस्यांचा कार्यकाळ १४ जून रोजी संपत आहे. तामिळनाडू विधानसभेत द्रमुककडे १३४ आमदार आहेत. यामुळे राज्यसभेच्या चार जागा द्रमुक सहज जिंकू शकतो. उर्वरित दोन जागा अण्णाद्रमुककडे जाण्याची शक्यता आहे. या पक्षाने भाजपाशी युती केली आहे.
Related
Articles
खराब हवामानाचा विमान सेवेला फटका
14 Jun 2025
फ्लडलाइट्स आयपीएलमध्ये हॅक करण्यात आले होते...
17 Jun 2025
मुंबईकरांसाठी ‘वॉटर मेट्रो’चा पर्याय
17 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
२७ वर्षापूर्वीही वाचला होता ‘११ ए॒' आसनामुळे एकाचा जीव
15 Jun 2025
खराब हवामानाचा विमान सेवेला फटका
14 Jun 2025
फ्लडलाइट्स आयपीएलमध्ये हॅक करण्यात आले होते...
17 Jun 2025
मुंबईकरांसाठी ‘वॉटर मेट्रो’चा पर्याय
17 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
२७ वर्षापूर्वीही वाचला होता ‘११ ए॒' आसनामुळे एकाचा जीव
15 Jun 2025
खराब हवामानाचा विमान सेवेला फटका
14 Jun 2025
फ्लडलाइट्स आयपीएलमध्ये हॅक करण्यात आले होते...
17 Jun 2025
मुंबईकरांसाठी ‘वॉटर मेट्रो’चा पर्याय
17 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
२७ वर्षापूर्वीही वाचला होता ‘११ ए॒' आसनामुळे एकाचा जीव
15 Jun 2025
खराब हवामानाचा विमान सेवेला फटका
14 Jun 2025
फ्लडलाइट्स आयपीएलमध्ये हॅक करण्यात आले होते...
17 Jun 2025
मुंबईकरांसाठी ‘वॉटर मेट्रो’चा पर्याय
17 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
२७ वर्षापूर्वीही वाचला होता ‘११ ए॒' आसनामुळे एकाचा जीव
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !