E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मोदी सरकारचे विकासाला प्राधान्य
Wrutuja pandharpure
15 Jun 2025
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचे प्रतिपादन
पिंपरी
: गेल्या ११ वर्षांत मोदी सरकारने पारदर्शकता, प्रामाणिकता, गतीशीलता आणि निर्णयक्षमतेसह कार्य केले आहे. पूर्वीच्या भ्रष्टाचार, घोटाळे आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाला पूर्णविराम देऊन विकासाला प्राधान्य देण्यात आले. ’शासन म्हणजे सेवा’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली गेली. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवले गेले. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (ऊइढ) प्रणालीमुळे योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने मध्यस्थांचा वाटा पूर्णपणे संपला आहे. वस्तू व सेवा कर (ॠडढ) प्रणालीमुळे करप्रणालीत सुसूत्रता येऊन भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. याच काळात कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीरचा भारताशी असलेला संबंध अधिक दृढ करण्यात आला, जो ऐतिहासिक निर्णय ठरला, असे गौरवोद्वार भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ११ वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहर भाजपने मोरवाडी, पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी या परिषदेत सरकारच्या ’सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण’ या त्रिसूत्रीवर आधारित विविध योजना, महत्त्वपूर्ण निर्णय आणि प्रभावी उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. ’आत्मनिर्भर भारत’ ते ’विकसित भारत’ अशा दूरदृष्टीच्या संकल्पाकडून भारताने सिद्धीकडे यशस्वी वाटचाल केली असून, या ११ वर्षांतील अभूतपूर्व कार्यक्षमतेवर यावेळी प्रकाश टाकण्यात आला.
यावेळी, आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, महेश कुलकर्णी, चंद्रकांत नखाते, संतोष कलाटे, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे, सरचिटणीस संजय मंगोडेकर, अजय पाताडे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ दुर्गे, युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, भाजपा ओबीसी आघाडी प्रदेश सरचिटणीस मनोज ब्राह्मणकर, भाजपा भटके-विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष कैलास सानप, सोशल मीडिया प्रभारी संजीवनी पांडेय, सोशल मीडिया प्रमुख अमेय देशपांडे आदी उपस्थित होते.
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने भरीव योगदान दिले आहे. रेल्वेसाठी तब्बल पावणे दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प महाराष्ट्रात सध्या सुरू आहेत. मागील यूपीए सरकारने १० वर्षांत दिलेल्या एकूण निधीपेक्षा अधिक निधी मोदी सरकारने केवळ एका वर्षात महाराष्ट्राला दिला आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रात राज्यात ६ लाख कोटी रुपयांची कामे वेगाने सुरू आहेत. ’प्रत्येकाला घर’ देण्याच्या संकल्पाकडे वाटचाल करत या सरकारने ३० लाख घरे देण्याचा विक्रम केला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प, जे गेली ४० वर्षांपासून रखडले होते, ते मोदी सरकारच्या काळात मार्गी लागले आणि आता पूर्णत्वाकडे जात आहेत.
गरीब कल्याण हे मोदी सरकारच्या धोरणांचे केंद्रबिंदू राहिले आहे. ८१ कोटी लोकांना मोफत अन्नधान्याचे वाटप करून अन्नसुरक्षा सुनिश्चित केली गेली आहे. जल जीवन मिशन अंतर्गत १५ कोटी लोकांना नळ जोडणी मिळाली आहे. आयुष्मान भारत योजनेमुळे ५ लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचारांची सुविधा मिळून लाखो गरिबांना आरोग्य कवच मिळाले आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून करोडो महिलांना स्वयंपाकासाठी मोफत गॅस कनेक्शन मिळाले.
Related
Articles
रिक्षा प्रवाशाकडून विनयभंग
03 Jul 2025
इंग्लंडचा ५ धावांनी विजय
06 Jul 2025
वाल्मीक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
03 Jul 2025
दिल्लीत जुन्या वाहनांना इंधन नाही
01 Jul 2025
वीज कर कपात हा देखावा
06 Jul 2025
छोट्या शेतकर्यांसाठी ७५ अब्ज डॉलर्सची गरज
07 Jul 2025
रिक्षा प्रवाशाकडून विनयभंग
03 Jul 2025
इंग्लंडचा ५ धावांनी विजय
06 Jul 2025
वाल्मीक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
03 Jul 2025
दिल्लीत जुन्या वाहनांना इंधन नाही
01 Jul 2025
वीज कर कपात हा देखावा
06 Jul 2025
छोट्या शेतकर्यांसाठी ७५ अब्ज डॉलर्सची गरज
07 Jul 2025
रिक्षा प्रवाशाकडून विनयभंग
03 Jul 2025
इंग्लंडचा ५ धावांनी विजय
06 Jul 2025
वाल्मीक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
03 Jul 2025
दिल्लीत जुन्या वाहनांना इंधन नाही
01 Jul 2025
वीज कर कपात हा देखावा
06 Jul 2025
छोट्या शेतकर्यांसाठी ७५ अब्ज डॉलर्सची गरज
07 Jul 2025
रिक्षा प्रवाशाकडून विनयभंग
03 Jul 2025
इंग्लंडचा ५ धावांनी विजय
06 Jul 2025
वाल्मीक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
03 Jul 2025
दिल्लीत जुन्या वाहनांना इंधन नाही
01 Jul 2025
वीज कर कपात हा देखावा
06 Jul 2025
छोट्या शेतकर्यांसाठी ७५ अब्ज डॉलर्सची गरज
07 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
3
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
6
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!