वाल्मीक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप समोर   

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या क्लिपमध्ये पैशांच्या व्यवहारातून कराड तरुणाला जातिवाचक शिवीगाळ करत असल्याचे दिसून येते.  
 
गावातील एका व्यक्तीने कामासाठी वाल्मीक कराडला दहा लाख रूपये दिले होते. मात्र, वाल्मीक कराड ते पैसे परत करत नव्हता. पैसे मागितल्यावर टाळाटाळ करत होता. पैसे परत करत नसल्याने त्याने कराडला फोन केला. संतापून कराडने त्या व्यक्तीला जातिवाचक शिवीगाळ केली. त्याचीच ही ऑडिओ क्लिप सध्या प्रसारित होत आहे. शिवीगाळ करून धमक्या दिल्यामुळे संबंधितांच्या कुटुंबीयांपैकी कोणीही पुढे येऊन तक्रार करण्यास तयार नाही.
   
दरम्यान, वाल्मीक कराडचे जुने सहकारी विजयसिंह बांगर यांनी पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासे केले आहेत. वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचे पीए प्रशांत जोशी यांना देखील मारायचे होते, असा आरोप बांगर यांनी केला आहे. बांगर म्हणाले, धनंजय मुंडेंचे पीए प्रशांत जोशी यांनी वाल्मीक कराडचा फोन न उचलल्याने तो संतापला होता. त्याने मला सांगितले की, आता प्रशांत जोशी याचा काटा काढायचा आहे. मी वाल्मीकला अनेक वेळा समजावून सांगितले होते, असा खुलासा बांगर यांनी केला आहे.

Related Articles