दिल्लीत जुन्या वाहनांना इंधन नाही   

काटेकोर अंमलबजावणी सुरू; कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कॅमेरातून लक्ष

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील विविध पेट्रोल पंपावर जुन्या वाहनांना इंधनपुरवठा करण्यास बंदी घालण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी मंगळवारपासून काटोकोरपणे सुरू झाली आहे. त्या अंतर्गत पंंपावर कृत्रिम बुद्धिमत्तेचे कॅमेरे बसविले असून पोलिसांचे पथक अनुचित प्रकार टाळण्यासाठी ठेवले आहेत. दिल्ली सरकारच्या आदेशानुसार सुमारे ३५० पंपावर वाहनांच्या नंबर प्लेटची पाहणी केली जात आहे. जुनी वाहने दिसली की त्यांना रोखले जात असून त्यांना इंधनपुरवठा केला जात नाही. वाहतूक विभागाने दिल्ली पोलिस, वाहतूक पोलिसांचे आणि महापालिकेचे कर्मचारी पंपावर कार्यरत आहेत. 
 
जुन्या वाहनांचा इंध:न पुरवठा बंद करण्यास काल सकाळी ६ वाजल्यापासून सुरुवात झाली. त्या अंतर्गत दहा वर्षांपूर्वीची डिझेलवरील आणि १५ 
वर्षांपूर्वीच्या पेट्रोलवर धावणार्‍या वाहनांची काटेकोर तपासणी करुन त्यांना पंपावर इंधन भरण्यास नकार दिला गेला.एखाद्या पंपावर इंधन भरण्यासाठी वाहन आले तर तेथील कृत्रिम बुद्धिमतेवरील कॅमेरे नंबर प्लेट टिपतात.  वाहन जुने असल्याचे आढळून आले तर तेथील सुरक्षा कर्मचार्‍यांना तात्काळ माहिती दिली जाते. यानंतर अशा वाहनांना घटनास्थळी रोखले जाते व त्यत इंधन भरले जात नाही, अशी माहिती वाहतूक अंमलबजावणी पथकाचे उप निरीक्षक धर्मवीर यांनी सांगितले. 
 
दरम्यान, दिल्लीच्या प्रदूषणाला जुनी वाहने मोठ्या प्रमाणात  कारणीभूत ठरत असल्याने दिसून आले होते. यानंतर राज्य सरकारने इंधन न देण्याचा निर्णय घेतला होता. डिझेलवर धावणारी १० वर्षांपूर्वीची आणि पेट्रोलवर धावणारी १५ वर्षौंपूर्वीची वाहने कालबाह्य झाली आहेत. ती रस्त्यावर आणता कामा नयेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये दिला होता. तत्पूर्वी २०१४ मध्ये राष्ट्रीय हरित लवादाने पंधरा वर्षांपूर्वीची वाहने सार्वजनिक ठिकाणी उभी करण्यास देखील मनाई केली होती.
 

Related Articles