पुणे : रिक्षातून प्रवास करणार्या एका अल्पवयीन मुलीसोबत एकाने आक्षेपार्ह कृत्य करून तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. प्रवासी अल्पवयीन मुलीसोबत दुसर्या प्रवाशाने तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी, पीडीत मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारदार महिला ही मंगळवारी दुपारी मुलीसोबत रिक्षातून पुणे-सोलापूर रस्त्याने निघाली होती. त्या वेळी रिक्षात प्रवासी म्हणून बसलेल्या एकाने महिलेच्या मुलीसोबत आक्षेपार्ह कृत्य करून तिचा विनयभंग केला. पीडीत मुलीने याबाबतची माहिती आईला दिली.
Fans
Followers