E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
’फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई
Samruddhi Dhayagude
12 Jun 2025
पुणे-लोणावळा लोकलसेवेसाठी आदेश
पिंपरी : मुंबई उपनगर रेल्वेतील मुंब्रा-दिवा स्थानकावर सोमवारी झालेल्या दुर्घटनेनंतर असुरक्षितरित्या रेल्वे प्रवास करणार्या रेल्वे प्रवाशांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यापार्श्वभूमीवर पुणे-लोणावळा लोकलसेवेत ‘फूट बोर्ड’वर उभे राहून प्रवास करणार्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.
मंगळवारपासूनच ह्या आदेशाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘आरपीएफ’द्वारा विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नियमभंग करणार्या रेल्वे प्रवाशांवर जागेवरच कारवाई केली जाणार आहे. रेल्वे सुरक्षा बलच्या (आरपीएफ) आयुक्त प्रियांका शर्मा यांनी यासंबंधीचा आदेश दिला आहे. रेल्वे कायद्याच्या १५६व्या कलमानुसार ही कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे.
मुंबईतील रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे प्रशासन ही विशेष मोहीम राबवित आहे. यासाठी ‘आरपीएफ’च्या जवानांना लोकलमध्ये गस्त घालण्याची सूचनाही देण्यात आली आहे. यासह पुणे-लोणावळा दरम्यान असलेल्या विविध स्थानकांपाशी प्रवाशांवर विशेष नजर ठेवली जाईल. धावत्या गाड्यांच्या दारात प्रवासी उभा असल्यास प्रत्यक्ष दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी पुणे-लोणावळा दरम्यान प्रवास करताना रेल्वेच्या नियमांचे पालन करण्याचे आणि सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘फूट बोर्ड’वर उभे राहून प्रवास करणे हा रेल्वे नियमाचा भंग आहेच, सोबत यातून प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण होतो. त्यामुळे संबंधित प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे ‘आरपीएफ’च्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त प्रियांका शर्मा यांनी सांगितले आहे.
Related
Articles
शेअर सर्टिफिकेट धारकांसाठी खुशखबर
07 Jul 2025
रशियाने युक्रेनवर डागली क्षेपणास्त्रे
05 Jul 2025
घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू मोफत मिळणार
02 Jul 2025
वाल्मीक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
03 Jul 2025
प्रत्युत्तर शुल्काची ट्रम्प यांची पुन्हा धमकी
07 Jul 2025
दुसर्या कसोटीत वेस्ट इंडिजचा १३३ धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय
08 Jul 2025
शेअर सर्टिफिकेट धारकांसाठी खुशखबर
07 Jul 2025
रशियाने युक्रेनवर डागली क्षेपणास्त्रे
05 Jul 2025
घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू मोफत मिळणार
02 Jul 2025
वाल्मीक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
03 Jul 2025
प्रत्युत्तर शुल्काची ट्रम्प यांची पुन्हा धमकी
07 Jul 2025
दुसर्या कसोटीत वेस्ट इंडिजचा १३३ धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय
08 Jul 2025
शेअर सर्टिफिकेट धारकांसाठी खुशखबर
07 Jul 2025
रशियाने युक्रेनवर डागली क्षेपणास्त्रे
05 Jul 2025
घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू मोफत मिळणार
02 Jul 2025
वाल्मीक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
03 Jul 2025
प्रत्युत्तर शुल्काची ट्रम्प यांची पुन्हा धमकी
07 Jul 2025
दुसर्या कसोटीत वेस्ट इंडिजचा १३३ धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय
08 Jul 2025
शेअर सर्टिफिकेट धारकांसाठी खुशखबर
07 Jul 2025
रशियाने युक्रेनवर डागली क्षेपणास्त्रे
05 Jul 2025
घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू मोफत मिळणार
02 Jul 2025
वाल्मीक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
03 Jul 2025
प्रत्युत्तर शुल्काची ट्रम्प यांची पुन्हा धमकी
07 Jul 2025
दुसर्या कसोटीत वेस्ट इंडिजचा १३३ धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय
08 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
3
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला
6
जीएसटी संकलनात घट