कीव : तीन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाने शुक्रवारी पहाटे युक्रेनची राजधानी कीववर ११ क्षेपणास्त्र आणि ५३९ ड्रोनने हल्ला केला. या हल्ल्यात २५ जण जखमी झाले. ५३९ रशियन ड्रोनपैकी ४७६ ड्रोन पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे.शुक्रवारी पहाटे शहरात स्फोट आणि ड्रोनचा आवाज ऐकू येत असल्याने हजारो रहिवाशांनी रात्र भुयारी रेल्वे स्थानकांसह किंवा भूमिगत पार्किंग लॉटमध्ये आश्रयस्थानांमध्ये घालवली.या हल्ल्यांमुळे अनेक शहरे आणि जिल्ह्यांमधील इमारती आणि संरचनांना आग लागली. बहुमजली इमारती अंशतः उद्ध्वस्त झाल्या. जखमींना रूग्णालयात नेणार्या पाच रुग्णवाहिकांचेही नुकसान झाले.
Fans
Followers