प्रत्युत्तर शुल्काची ट्रम्प यांची पुन्हा धमकी   

१२ देशांना पाठवले पत्र 

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रत्युत्तर शुल्काची पुन्हा धमकी दिली आहे. ९ जुलैपर्यंत व्यापार करार करा अन्यथा ते लादले जाईल, असा इशारा दिला आहे. या संदर्भात त्यांनी १२ देशांना पत्र देखील पाठवले आहे. 
 
अमेरिकेला विविध देशांबरोबर व्यापार करार करायचा आहे. त्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. अन्य देश अमेरिकेपेक्षा अधिक आयात शुल्क आकारत आहे. त्यामुळे अमेरिकेचे प्रचंड नुकसान होते, असा दावा त्यांनी करुन व्यापार करार करण्यासाठी भारतासह अन्य देशांना ९० दिवसांची मुदत दिली होती. ती येत्या बुधवारी संपुष्टात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. दरम्यान, ब्रिटन आणि व्हिएतनाम सोबत अमेरिकेने व्यापार करार केला. 
 
जपान आणि युरोपीयन महासंघाने अजूनही त्यांना त्यासाठी प्रतिसाद दिलेला नाही. भारताचे शिष्टमंडळ अमेरिकेत वाटाघाटी करुन नुकतेच परतले आहे. तसेच हंगामी व्यापारी करार करण्याची तयारी दाखवली आहे. 

Related Articles