E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शालेय बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करा
Samruddhi Dhayagude
12 Jun 2025
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचना
पुणे : शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या तसेच सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणार्या स्कूल बस चालकांनी स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.
पोलीस आयुक्तालयात आयोजित शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, पुण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले, पिंपरी चिंचवडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव, बारामतीचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त कुमार म्हणाले, शाळेत मुलांची ने-आण करणारी बस व इतर वाहने मुलांकरिता सुरक्षित राहतील याची खबरदारी संबंधित शाळेने घ्यावी याकरीता प्रत्येक बस व इतर वाहनात सीसीटीव्ही लावणे अनिवार्य करावे.
शाळेच्या बसमध्ये ६ वर्षाखालील मुलांना ने-आण करणेकरिता महिला कर्मचार्यांची नियुक्ती करावी.वाहनचालक, कंडक्टर, क्लीनर आदींची पोलीस पडताळणी करुन घ्यावी. बसेसचे वाहनचालक चांगले प्रशिक्षित, नैतिकदृष्ट्या सक्षम, पूर्वेतिहास चांगला असणारे असल्याची खात्री शालेय परिवहन समितीने करणे आवश्यक आहे. स्कुल बस चालक व अटेंडंट यांचे चारित्र्य पडताळणी, नेत्रतपासणी आणि वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी.
शिक्षण विभागामार्फत शाळा स्तरावर परिवहन समिती स्थापन केल्याबाबतचा आढावा घ्यावा. स्कुल बसेसची वाहनांची कसून तपासणी करावी. खासगी वाहनातून शालेय विद्यार्थी वाहतूक करणार्या वाहनांची विशेष तपासणी मोहिम राबवावी. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या वाहनांवर, चालकांवर कठोर कारवाई करावी. सर्व संबंधित यंत्रणांनी बैठक घेऊन तसेच शालेय परिवहन समितीने स्कूल बस नियमावलीनुसार काम करीत असल्याची खात्री करावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, स्कूल बसचे अपघात रोखण्यासाठी शाळा, परिवहन विभाग, पोलीस विभाग यांच्यामध्ये समन्वय असावा, असेही कुमार म्हणाले.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
02 Jul 2025
पंढरीत आषाढीनिमित्त २० लाख वैष्णवांचा महासोहळा
07 Jul 2025
शेख हसिना यांना सहा महिन्यांची शिक्षा
03 Jul 2025
‘एफ-३५ बी’ दुरुस्तीसाठी आले
07 Jul 2025
पंचनामे पूर्ण होताच मदतीचे वाटप
02 Jul 2025
नऊ जण अद्याप बेपत्ता
04 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
02 Jul 2025
पंढरीत आषाढीनिमित्त २० लाख वैष्णवांचा महासोहळा
07 Jul 2025
शेख हसिना यांना सहा महिन्यांची शिक्षा
03 Jul 2025
‘एफ-३५ बी’ दुरुस्तीसाठी आले
07 Jul 2025
पंचनामे पूर्ण होताच मदतीचे वाटप
02 Jul 2025
नऊ जण अद्याप बेपत्ता
04 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
02 Jul 2025
पंढरीत आषाढीनिमित्त २० लाख वैष्णवांचा महासोहळा
07 Jul 2025
शेख हसिना यांना सहा महिन्यांची शिक्षा
03 Jul 2025
‘एफ-३५ बी’ दुरुस्तीसाठी आले
07 Jul 2025
पंचनामे पूर्ण होताच मदतीचे वाटप
02 Jul 2025
नऊ जण अद्याप बेपत्ता
04 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
02 Jul 2025
पंढरीत आषाढीनिमित्त २० लाख वैष्णवांचा महासोहळा
07 Jul 2025
शेख हसिना यांना सहा महिन्यांची शिक्षा
03 Jul 2025
‘एफ-३५ बी’ दुरुस्तीसाठी आले
07 Jul 2025
पंचनामे पूर्ण होताच मदतीचे वाटप
02 Jul 2025
नऊ जण अद्याप बेपत्ता
04 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
3
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
6
अधिकार्यांकडून एमईएससी अभ्यासक्रम पूर्ण