शेख हसिना यांना सहा महिन्यांची शिक्षा   

ढाका : माजी पंतप्रधान शेख हसिना यांना गुन्ह्यात अडकवण्यासाठी बांगलादेशातील महमद युनूस यांच्या सरकारने पावले टाकली आहेत. त्या अंतर्गत ढाका येथील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने हसिना यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा बुधवारी ठोठावली आहे. न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाच्या लवाद 1 चे न्यायाधीश महमद मुजूमदार यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्य असलेल्या न्यायालयाने याबाबतचा निकाल दिला. 

Related Articles