व्हॉट्सऍप कट्टा   

शेफाली जरीवाला 
हिची अकाली ‘एक्झिट’ का?
जे वय आहे त्यापेक्षा तरुण दिसणे ही गोष्ट भूषणावह आहेच; पण ते निसर्गाचे दान असेल तर ठीक...
नसेल तर, 
जो आटापिटा सिनेमा जगतातील लोकं करतात तर, त्यांना किमान तसा खर्चिक असा मेडिकल बॅकअप असतो.
पण त्याचे अनुसरण करणे अत्यंत धोकादायक...
शेफाली हिला देखील तसा बॅकअप असून सुद्धा त्या अनैसर्गिक मार्गाचा अतिरेक म्हणा किंवा साईड इफेक्ट म्हणा, मृत्यू पर्यंत घेऊन गेला.
आपल्याकडे सलमानसारखी शरीरयष्टी बनवणे एक वेड आहे, फॅड आहे...
त्यात भर पडते जिममधील पावडर गँगची...
अनेकांना त्यामुळे किडनी स्टोन, हाडे ठिसूळ होणे, केस गळणे, मूल न होणे याचा सामना करावा लागतो.
एक वेळ जीव गेला तर बरे, अशा शारीरिक व्याधी मागे लागतात.!
आयुर्वेदात अशी रसायन चिकित्सा वर्णिली आहे. त्यात योग साधना, निद्रा, आहार विहार यांना खूप महत्व आहे. मग औषधी उपचार लागू केले जातात.
मित्रांनो,
निसर्गाशी खेळू नका...
शरीर हा निसर्गाचा एक भाग आहे...
त्याला निसर्गाची जोड द्या...
केमिकलची नव्हे!!!
(‘फेसबुक’ वरून साभार)
---
सुख हे उमलत असणार्‍या फुलासारखे असावं. जे दररोज उमलत रहावं आणि दुःख हे गळत असणार्‍या पानासारखं असावं, 
जे क्षणात निघून जावं... 
---
मन वळू नये, अशी श्रद्धा हवी.
निष्ठा ढळू नये, अशी भक्ती हवी.
सामर्थ्य संपू नये, अशी शक्ती हवी.
कधी विसरू नये, अशी नाती हवी... 
--
ज्यांना ज्यांना लहान मुली असतील त्यांनी या वयापासूनच तिच्या मनगटात रग निर्माण करावी. मुलगी दहा वर्षांची होईपर्यंत तीस वर्षाच्या माणसाला लोळवेल इतका प्रचंड आत्मविश्वास तिच्यामध्ये उत्पन्न करा. मुलीला ताकदीची जाणीव करून द्या. नाजूक बिजूक हे असले प्रकार सोडा. डोळ्यात आग दिसली पाहिजे.
भीती वाटते असं सतत म्हणण्यापेक्षा मुलींना समाजात भिडायचं कसं ते शिकवा. ब्युटीपार्लर, फॅशन, डिझाईन मेहंदी असले कोर्स करण्यापेक्षा लाठीकाठी, तलवारबाजी, कराटे, कुंगफू, कुस्ती असे दर्जेदार आणि भविष्यात उपयोगी पडणार्‍या कला अवगत करण्यात वेळ खर्ची केला गेला पाहिजे... 
बस झाले आता रडत बसणे.. न्याय मागणे... आता लढायला शिकवू...
----
कडुनिंबाची चुक नाही की तो कडू आहे,
स्वार्थी तर जीभ आहे, तिला फक्त गोड आवडतं... संवाद संपला कि नातं थांबतं. म्हणून बोलून बघा कदाचित, 
तुमचं हरवलेलं उत्तर तुम्हाला सापडेल.
श्वास व विश्वास दोन्हीं अदृश्य आहेत
परंतु दोघांत इतकी ताकद आहे की
अशक्य गोष्टीला शक्य बनवून देतात...

Related Articles