E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
प्रियकराच्या मदतीने सोनमने राजाला संपवले
Samruddhi Dhayagude
10 Jun 2025
मेघालयातील शिलाँग येथे मधुचंद्रासाठी गेलेल्या इंदूरच्या राजा रघुवंशीची हत्या त्याची पत्नी सोनम हिने केल्याचे तपासात समोर आले आहे. प्रियकर राज कुशवाहसोबत मिळून तिने तीन मारेकर्यांना राजाच्या हत्येची सुपारी दिली होती. मारेकर्यांनी संधी साधून मेघालयात राजाची हत्या केली. तेव्हापासून सोनम बेपत्ता होती. तीन मारेकर्यांना अटक केल्यानंतर सोनम गाझीपूर पोलिसांना शरण आली.
काय आहे प्रकरण?
सोनम ही इंदूरच्या गोविंद कॉलनीतील रहिवासी आहे. तिने बी. कॉमपर्यंत शिक्षण घेतले आहे. ११ मे रोजी तिने राजा रघुवंशी याच्याशी विवाह केला. विवाहानंतर २२ मे रोजी हे जोडपे मधुचंद्रासाठी शिलाँगला गेले. २३ मे रोजी सायंकाळी चेरापुंजीजवळील ओसारा हिल्स येथून दोघेही बेपत्ता झाले. कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु तो होऊ शकला नाही. त्यानंतर, कुटुंबातील काही सदस्य स्वतः शिलाँगला पोहोचले. राजा आणि सोनमचा कोणताही पत्ता न लागल्याने कुटुंबाने तात्काळ इंदूरला परत येऊन पोलिसांकडे मदतीसाठी याचना केली. शिलाँगमध्ये जोडप्याचा शोध सुरू झाल्यावर, त्यांनी भाड्याने घेतलेली स्कूटी सापडली, ज्यामुळे कुटुंबाला ते दोघेही सापडतील अशी आशा होती. मात्र, ११ दिवसांनी राजाचा मृतदेह सापडला, तर त्यांची पत्नी सोनम बेपत्ता होती.
कारस्थान रचून तिकीटांचे बुकींग
सोनमला मधुचंद्रासाठी काश्मीरला जायचे होते; पण त्याचदरम्यान पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. राजाला या परिस्थितीत मधुचंद्रासाठी जायची इच्छा नव्हती. मात्र, सोनमने कारस्थान रचायला सुरूवात केली होती. तिने मेघालयची निवड करून २० मे ची तिकीटे बुक केली. त्यामुळे राजाला मेघालयला जाण्याशिवाय पर्याय नव्हता. दोघेही मेघालयला गेले. कारस्थानानुसार आरोपीही तिथे पोहचले होते. राज कुशवाह तिथे नव्हता. मात्र, तो फोनवरून सोनमच्या संपर्कात होता. संधी मिळताच विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद या मारेकर्यांनी राजाला ठार मारले आणि मृतदेह दरीत फेकून दिला.
मृतदेहाच्या विल्हेवाटानंतर आरोपी झाले वेगळे
मारेकर्यांनी सोनम आणि राजच्या सूचनेप्रमाणे राजा रघुवंशीची हत्या केली. त्यानंतर तिघेही मारेकरी वेगळे झाले. त्यानंतर सोनम नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होती. मात्र, दोन मारेकर्यांनी सोनमला सोळा दिवस लपून बसण्यास आणि इतर ठिकाणी प्रवास करण्यात मदत केली.
राजाच्या हत्येसाठी ’दाओ’चा वापर
पूर्व खासी हिल्सचे पोलिस अधीक्षक विवेक सायम यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा रघुवंशीची हत्या झाडे कापण्यासाठी वापरण्यात येणार्या ‘दाओ’ या शस्त्राने करण्यात आली आहे. त्याची हाडेही तुटलेली आहेत. राजाचा मोबाइल आणि हत्या करण्यासाठी वापरलेले शस्त्र आम्हाला सापडले आहे.
शिलाँगमध्ये शस्त्रांची खरेदी
पोलिसांनी सोनमच्या कॉल डिटेल्सची चौकशी केली तेव्हा ती आरोपींच्या सतत संपर्कात असल्याचे उघड झाले. आरोपींनी शिलाँगमध्ये शस्त्रे खरेदी केली होती. हत्येनंतर राजाचा टी-शर्ट, मोबाईल आणि शस्त्रे दुसर्या ठिकाणी असलेल्या स्कूटरच्या डीकीमध्ये ठेवण्यात आली. त्यावरून सोनमची हत्या झाली नसून, तीच या कटाची सूत्रधार असल्याचे पोलिसांना स्पष्ट झाले होते.
प्रियकरासाठी पतीची हत्या
सोनम तिच्याच वडिलांच्या प्लायवूडच्या कारखान्यात एचआर म्हणून काम करत होती. तिथे व्यवस्थापक म्हणून काम करण्यार्या राज कुशवाहसोबत तिचे प्रेमसंबंध होते. राजा रघुवंशीसोबच्या विवाहानंतरही तिचे राजसोबत प्रेमसंबंध कायम होते. प्रेमासाठी सोनमने पतीची हत्या घडवून आली. सोनमच्या कुटुंबाने मात्र आपली मुलगी निर्दोष असल्याचा दावा केला आहे.
प्रेमप्रकरण नसल्याचा दावा
राज कुशवाह हा माझ्यासोबत काम करतो. सोनमचा राजशी कोणताही संबंध नव्हता. सोनम आणि राजा दोघांचाही संमतीने विवाह झाला होता. राजाशी विवाह करण्यासाठी सोनमवर कोणताही दबाव नव्हता, असे सोनमचे वडील देवी सिंह यांनी सांगितले.
सोनमने सोबत नेले होते नऊ लाख
सोनम तिच्या लग्नात मिळालेले ९ लाख रुपये आणि दागिने सोबत घेऊन गेली होती, जेणेकरून हत्येनंतर ती काही काळ बाहेर राहू शकेल. हत्येनंतर सोनमला वाराणसीहून गोरखपूरला जायचे होते. तिथून नेपाळला जाणे तिच्यासाठी सोपे होते; पण नंतर ती गाजीपूरला पोहोचली. सोनमने मारेकर्यांना काही पैसेही दिले होते.
Related
Articles
‘तिबेटची सेवा करण्यासाठी आणखी ४० वर्षे जगण्याची उमेद’
06 Jul 2025
राजेश कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव
01 Jul 2025
बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थांच्या कार्यपद्धतीत सुसूत्रता आणणार
04 Jul 2025
राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती
02 Jul 2025
बागेश्वर धाममध्ये शेड कोसळून एकाचा मृत्यू, ८ जण जखमी
03 Jul 2025
अनिवासी भारतीय आता UPI वापरू शकणार
04 Jul 2025
‘तिबेटची सेवा करण्यासाठी आणखी ४० वर्षे जगण्याची उमेद’
06 Jul 2025
राजेश कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव
01 Jul 2025
बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थांच्या कार्यपद्धतीत सुसूत्रता आणणार
04 Jul 2025
राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती
02 Jul 2025
बागेश्वर धाममध्ये शेड कोसळून एकाचा मृत्यू, ८ जण जखमी
03 Jul 2025
अनिवासी भारतीय आता UPI वापरू शकणार
04 Jul 2025
‘तिबेटची सेवा करण्यासाठी आणखी ४० वर्षे जगण्याची उमेद’
06 Jul 2025
राजेश कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव
01 Jul 2025
बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थांच्या कार्यपद्धतीत सुसूत्रता आणणार
04 Jul 2025
राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती
02 Jul 2025
बागेश्वर धाममध्ये शेड कोसळून एकाचा मृत्यू, ८ जण जखमी
03 Jul 2025
अनिवासी भारतीय आता UPI वापरू शकणार
04 Jul 2025
‘तिबेटची सेवा करण्यासाठी आणखी ४० वर्षे जगण्याची उमेद’
06 Jul 2025
राजेश कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव
01 Jul 2025
बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थांच्या कार्यपद्धतीत सुसूत्रता आणणार
04 Jul 2025
राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती
02 Jul 2025
बागेश्वर धाममध्ये शेड कोसळून एकाचा मृत्यू, ८ जण जखमी
03 Jul 2025
अनिवासी भारतीय आता UPI वापरू शकणार
04 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
3
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
6
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!