बागेश्वर धाममध्ये शेड कोसळून एकाचा मृत्यू, ८ जण जखमी   

छतरपूर : मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाममध्ये टिन शेड कोसळल्याने मोठी दुर्घटना झाली. या घटनेत एका भाविकाचा मृत्यू झाला आणि ८ जण जखमी झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस प्रशासनाने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच मदत आणि बचावकार्य सुरू केले.
 
गुरुवार सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे बाबा बागेश्वर यांचे काही भक्त हे टिन शेडखाली उभे होते. याच दरम्यान शेड कोसळल्याने चेंगराचेंगरी झाली आणि अनेक लोक खाली पडले.उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील रहिवासी असलेले राजेश यांचे सासरे श्यामलाल कौशल (५० वर्षे) यांचा यामध्ये मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. तसेच सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
 
राजेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी म्हणजेच ४ जुलै रोजी धीरेंद्र शास्त्री यांचा वाढदिवस आहे. यामुळे त्यांचं कुटुंब उत्तर प्रदेशहून बागेश्वर धामला आले होते. गुरुवारी सकाळी सर्वजण तयारी करून शास्त्रींना भेटण्यासाठी पोहोचले. याच दरम्यान ही घटना घडली.

Related Articles