राजेश कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव   

मुंबई  : राज्याच्या मुख्य सचिवपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेश कुमार यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी  सोमवारी मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी मंत्रालयातील अनेक सनदी अधिकार्‍यांनी राजेश कुमार यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.  मुख्य सचिवपदी नियुक्त झालेले राजेश कुमार ४९ वे सनदी अधिकारी आहेत. मात्र, ऑगस्टमध्येच सेवानिवृत्त होणार असल्यामुळे राजेश कुमार यांना मुख्य सचिव पदासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मान मिळालेल्या सुजाता सौनिक काल नियत वयोमानुसार सेवानिवृत्त झाल्या. त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या जागी   महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली. राजेश कुमार हे १९८८ च्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत. पुढील दोन महिन्यांत म्हणजे ऑगस्ट २०२५ मध्ये ते  सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांना जेमतेम दोन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.

Related Articles