E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
सातार्यात सेतूचा सर्व्हर सारखाच डाऊन
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
दाखल्यांसाठी पालक, विद्यार्थ्यांचे हाल
सातारा,(प्रतिनिधी) : महसूल विभागाचा सर्वच कारभार संगणिकृत झाला असला तरी सध्या सेतू विभागाचा सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने शैक्षणिक दाखले मिळवण्यासाठी पालक विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील सर्वच ११ तहसील कार्यालयात रोजच अपडाउन करावे लागत आहे.सेतूचा सर्व्हर बहुतांशवेळा डाऊन रहात असल्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा फुकट वाया जात आहे. सरकारी काम अन सहा महिने थांब या उक्तीची प्रचिती विद्यार्थी व पालकांना अनुभवायला मिळत आहे.
सध्या १० वी व १२ वीच्या मुलांच्या विविध शैक्षणिक क्षेत्रात ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. त्यासाठीजात प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व, अधिवासरहिवासी व उत्पन्न दाखला, शेतकरी पुरावा, आर्थिक दुर्बल व अन्य विविध शैक्षणिक दाखल्यांची विद्यार्थ्यांना तातडीची गरज आहे. परंतु सेतू सर्व्हर डाऊनमुळे दाखले वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश अडचणीत येण्याची भीती पालकवर्गाला वाटू लागली आहे.
खरंतर सेतू कार्यालय तहसील कार्यालय व नागरिक यामधील दुवा म्हणून काम करते. परंतु, गेले काही दिवस सेतूचा सर्व्हर कायमच ऑफलाइन दाखवत असल्याने विद्यार्थी व पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ’जनसेवेच्या सेतूचा दुवा निखळ्ळून पडला आहे’, असे म्हणण्याची दुर्दैवी वेळ वाईकर जनतेवर आली आहे.
महसूल अधिकारी यावर पर्यायी काहीच उपाय शोधत नसल्याने सेतू कर्मचारी मात्र पालकांच्या कचाट्यात सापडत आहेत व त्यांना नाहक नागरिकांच्या शिव्या खाव्या लागत आहेत. नागरिकांच्या गैरसमजातून सेतू कार्यालयामध्ये अनेकदा वादाचे प्रसंग घडत आहेत.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ४८ तासांत दाखले देण्याचे आदेश दिले असताना सर्व्हर डाऊनच्या कारणाने दाखल्यांना किमान चार ते सहा दिवस वाट पाहावी लागत आहे. कधी महसूलचा सर्व्हर डाऊन तर कधी महाऑनलाईनचा सर्व्हर डाऊन या खेळात पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकारी याकडे लक्ष देऊन काय तोडगा काढणार याकडे लक्ष आहे.
सर्व्हर चालू होईल या अपेक्षेपोटी विद्यार्थी, पालक दाखल्यांसाठी सेतूचा दारात दिवसभर ताटकळत उभे राहत आहेत. परंतु सर्व्हर काही ऑनलाइन होत नाही. त्यामुळे दाखले वेळेत मिळत नाहीत याची गंभीर दखल महसूल विभागाने घेणे गरजेचे आहे, अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुक्सान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Related
Articles
तीन वेळा नापास झाल्याने तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न
07 Jul 2025
बांधकाम परवानगीच्या मनाईचा अर्ज फेटाळला
02 Jul 2025
पाकिस्तानी संघाला भारतात येण्याची केंद्र सरकारची परवानगी
04 Jul 2025
ऋषभ पंतने मारले तब्बल 24 षटकार
07 Jul 2025
माजी खासदार आनंद सिंह यांचे निधन
07 Jul 2025
नवीन गुन्हेगारी कायद्यांमुळे न्याय प्रशासनात गोंधळ : चिदंबरम
03 Jul 2025
तीन वेळा नापास झाल्याने तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न
07 Jul 2025
बांधकाम परवानगीच्या मनाईचा अर्ज फेटाळला
02 Jul 2025
पाकिस्तानी संघाला भारतात येण्याची केंद्र सरकारची परवानगी
04 Jul 2025
ऋषभ पंतने मारले तब्बल 24 षटकार
07 Jul 2025
माजी खासदार आनंद सिंह यांचे निधन
07 Jul 2025
नवीन गुन्हेगारी कायद्यांमुळे न्याय प्रशासनात गोंधळ : चिदंबरम
03 Jul 2025
तीन वेळा नापास झाल्याने तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न
07 Jul 2025
बांधकाम परवानगीच्या मनाईचा अर्ज फेटाळला
02 Jul 2025
पाकिस्तानी संघाला भारतात येण्याची केंद्र सरकारची परवानगी
04 Jul 2025
ऋषभ पंतने मारले तब्बल 24 षटकार
07 Jul 2025
माजी खासदार आनंद सिंह यांचे निधन
07 Jul 2025
नवीन गुन्हेगारी कायद्यांमुळे न्याय प्रशासनात गोंधळ : चिदंबरम
03 Jul 2025
तीन वेळा नापास झाल्याने तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न
07 Jul 2025
बांधकाम परवानगीच्या मनाईचा अर्ज फेटाळला
02 Jul 2025
पाकिस्तानी संघाला भारतात येण्याची केंद्र सरकारची परवानगी
04 Jul 2025
ऋषभ पंतने मारले तब्बल 24 षटकार
07 Jul 2025
माजी खासदार आनंद सिंह यांचे निधन
07 Jul 2025
नवीन गुन्हेगारी कायद्यांमुळे न्याय प्रशासनात गोंधळ : चिदंबरम
03 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
3
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
6
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!