माजी खासदार आनंद सिंह यांचे निधन   

गोंडा : उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गोंडाचे माजी खासदार कुंवर आनंद सिंह यांचे लखनौ येथे निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. उत्तर प्रदेशचा वाघ म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व केंंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री किर्ती वर्धन सिंह आणि तीन मुली असा परिवार आहे. 
 
कुंवर आनंद सिंह यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलविले. रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना मानकपूर राजघराण्याचा वारसा लाभला होता. राजा राघवेंद्र प्रताप सिंह यांचे पुत्र होते  वडिलांच्या निधनानंतर ते राजकारणात आले. १९६४ आणि १९६७ मध्ये लोकसभेवर निवडून गेले होते. माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. गोंडा येथून १९७१ त्यानंतर १९८०, १९८४ आणि १९८९ मध्ये खासदार झाले. १९९१ आणि १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त करुन आनंद यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

Related Articles