E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
पाकिस्तानी संघाला भारतात येण्याची केंद्र सरकारची परवानगी
Samruddhi Dhayagude
04 Jul 2025
बर्मिंगहॅम : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे बिघडले आहेत. त्या घटनेनंत भारताने सिंधू पाणी करार स्थगित करणे, सीमा बंद करणे आणि पाक नागरिकांना परत पाठवण्यासारखे मोठे निर्णय घेतले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानीहॉकी संघाला भारतात खेळण्याची परवानगी मिळाली आहे.
पुढील महिन्यात होणार्या आशिया कपसाठी पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येईल. क्रीडा मंत्रालयातील एका सूत्राने गुरुवारी ही माहिती दिली.मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय क्रीडा मंत्रालयाने म्हटले की, आम्ही कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतात खेळणार्या कोणत्याही संघाच्या विरोधात नाही, परंतु द्विपक्षीय (फक्त भारत आणि पाकिस्तानमधील) सामने हा वेगळा विषय आहे. म्हणजेच, आता पाकिस्तानचा हॉकी संघ आशिया कप आणि ज्युनियर हॉकी विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येईल. आशिया कप हॉकी स्पर्धा २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान बिहारमधील राजगीर येथे खेळली जाईल.
दोन्ही देशातील बिघडलेल्या संबंधांमुळे आशिया कप हॉकी स्पर्धेत पाकिस्तानच्या सहभागाबद्दल शंका व्यक्त केल्या जात होत्या. मात्र, आता पाकिस्तानी संघाला भारतात खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे.
आशिया कप व्यतिरिक्त, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार्या ज्युनियर विश्वचषकातही पाकिस्तानच्या संघाला खेळण्याची परवानगी दिली जाईल.
हॉकी इंडियाचे सचिव भोलानाथ सिंह यांनी पाकिस्तान संघाच्या भारत दौर्याबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, आम्ही सरकारच्या सूचनांनुसार काम करू. सरकार जे काही निर्णय घेईल, ते आमचे मत असेल.
हॉकीसोबतच या वर्षी भारतात क्रिकेटचा टी-२० आशिया कप आयोजित केला जाणार आहे. ही स्पर्धा ४ किंवा ५ सप्टेंबरपासून सुरू होऊ शकते. यासाठी पाकिस्तानी क्रिकेट संघाला परवानगी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. परवानगी मिळाली नाही, तर भारत आणि पाकिस्तानमधील सामना यूएईमध्ये होण्याची शक्यता आहे. अंतिम वेळापत्रक आणि ठिकाण लवकरच अधिकृतपणे जाहीर केले जाईल.
Related
Articles
कोस्टलवर २३६ सीसीटीव्हीचा वॉच
22 Jul 2025
बाजारात खोबर्याचा तुटवडा
20 Jul 2025
व्हीआयपींच्या नातेवाईकांमुळे भाविक आणि प्रशासन हैराण
22 Jul 2025
मालमोटारीने चौघांना चिरडले; तीन ठार
20 Jul 2025
हवामान बदलाचे शहरांवर संकट
23 Jul 2025
राहुल यांच्या विधानावर मार्क्सवादी नेत्याची टीका
20 Jul 2025
कोस्टलवर २३६ सीसीटीव्हीचा वॉच
22 Jul 2025
बाजारात खोबर्याचा तुटवडा
20 Jul 2025
व्हीआयपींच्या नातेवाईकांमुळे भाविक आणि प्रशासन हैराण
22 Jul 2025
मालमोटारीने चौघांना चिरडले; तीन ठार
20 Jul 2025
हवामान बदलाचे शहरांवर संकट
23 Jul 2025
राहुल यांच्या विधानावर मार्क्सवादी नेत्याची टीका
20 Jul 2025
कोस्टलवर २३६ सीसीटीव्हीचा वॉच
22 Jul 2025
बाजारात खोबर्याचा तुटवडा
20 Jul 2025
व्हीआयपींच्या नातेवाईकांमुळे भाविक आणि प्रशासन हैराण
22 Jul 2025
मालमोटारीने चौघांना चिरडले; तीन ठार
20 Jul 2025
हवामान बदलाचे शहरांवर संकट
23 Jul 2025
राहुल यांच्या विधानावर मार्क्सवादी नेत्याची टीका
20 Jul 2025
कोस्टलवर २३६ सीसीटीव्हीचा वॉच
22 Jul 2025
बाजारात खोबर्याचा तुटवडा
20 Jul 2025
व्हीआयपींच्या नातेवाईकांमुळे भाविक आणि प्रशासन हैराण
22 Jul 2025
मालमोटारीने चौघांना चिरडले; तीन ठार
20 Jul 2025
हवामान बदलाचे शहरांवर संकट
23 Jul 2025
राहुल यांच्या विधानावर मार्क्सवादी नेत्याची टीका
20 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
बाजारात खोबर्याचा तुटवडा
5
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
6
टीआरएफ आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना