तीन वेळा नापास झाल्याने तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न   

पुणे : अभियांत्रिकीच्या परीक्षेत तीन वेळा नापास झाल्यामुळे तरूणाने राजाराम पूलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या तरूणाला वाचवले. ही घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.आत्महत्येचा प्रयत्न कऱणारा तरूण हा पुण्यातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार त्याला मागील तीन वर्षांत परिक्षेमध्ये सतत अपयश येत होते. त्यामुळे, नैराश्यातून त्याने रविवारी दुपारी चारच्या सुमारास राजाराम पूलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. 
 
राजाराम पूलावरून जाणार्‍या नागरिकांनी हा प्रकार पाहताच, घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर, अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी दाखल होऊऩ, या तरूणाचे प्राण वाचवले. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, संबंधित तरूणाची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, तरूणाने नदीमध्ये उडी मारल्याच्या प्रकारानंतर या पूलावरून जाणार्‍या नागरिकांनी एकट गर्दी केली होती. बघ्यांची गर्दी झाल्यामुळे याठिकाणी काही काळ वाहतुक कोंडी झाली होती.

Related Articles